Asthma
AsthmaDainik Gomantak

Asthma : जाणून घ्या रात्री 'दमा' वाढण्याचे कारण

अलीकडे झालेल्या अभ्यासानुसार रात्रीच्या वेळी सर्व वयोगटातील रुग्णांमध्ये Asthma तीव्रता वाढण्याचे कारण समोर आले आहे.
Published on

अलीकडे झालेल्या अभ्यासानुसार रात्रीच्या वेळी सर्व वयोगटातील रुग्णांमध्ये दम्याची (Asthma) तीव्रता वाढण्याचे कारण (reason) समोर आले आहे. सर्केडियन (circadian clock) रिदम पद्धतीचा वापर करून हे संशोधन (Researchers) केले गेले ज्यात झोप आणि शारीरिक क्रियाकलापांचा सुद्धा समावेश आहे. आणि या संशोधनातून रात्रीच्या वेळी दम्याचा त्रास वाढत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Asthma
Long Covid: दीर्घ कोविडमुळे होऊ शकतो मूत्राशयचा गंभीर आजार

द प्रोसिडींग्ज ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यास अहवालानुसार, संशोधकांनी दम्याच्या तीव्रतेवर परिणाम करणारी यंत्रणा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

संशोधनाचे सह-लेखक, स्टीव्हन ए. शिया यांनी संशोधन केल्यानंतर दावा केला की, "आम्ही पाहिले की ज्या लोकांना सर्वात जास्त दमा आहे, सामान्यतः त्यानांच फुफ्फुसाच्या कार्यामध्ये सर्वात जास्त सर्केडियन-प्रेरित थेंबांचा त्रास होतो. संशोधनानुसार रात्री झोपेसह सर्वात मोठे बदल वर्तनामध्ये घडले आहेत . आम्हाला असेही आढळले की हे परिणाम वैद्यकीयदृष्ट्या महत्वाचे आहेत.

Asthma
'Copper Water' चे काय आहेत फायदे

संशोधकांनी पाहिले की जवळपास 75% लोकांना ज्यांना दम्याचे निदान झाले आहे त्यांनी रात्रीच्या वेळी त्यांची स्थिती बिघडल्याचे सांगितले आहे. शिवाय, अनेक घटक रोगांच्या तीव्रतेवर परिणाम करतात, ज्यात हवेचे तापमान, वातावरणातील ओलावा, व्यायाम, झोपेचे वातावरण आणि दैनंदिन क्रिया यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com