Ashwagandha-Shatavari Benefits: अश्वगंधा-शतावरीचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

Ashwagandha-Shatavari Benefits: तर तुमच्यासाठी शतावरी आणि अश्वगंधाचे सेवन करणे फायदेशीर ठरेल.
Ashwagandha-Shatavari Benefits
Ashwagandha-Shatavari BenefitsDainik Gomantak
Published on
Updated on

Ashwagandha-Shatavari Benefits: आयुर्वेदात आपल्या निरोगी आरोग्यासाठी अनेक वनस्पती उपयोगी असल्याचे सांगितले आहे. त्यामध्ये अश्वगंधा, शतावरी अशा वनस्पतींचादेखील समावेश होतो. आज आपण शतावरी आणि अश्वगंधाचा आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत हे जाणून घेणार आहोत.

तुमचे वजन कमी असेल आणि ते वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करत असाल तर तुमच्यासाठी शतावरी आणि अश्वगंधाचे सेवन करणे फायदेशीर ठरेल.

बाजारात या दोन्ही वनस्पतींची पावडर तुम्हाला सहजपणे मिळते. त्या दोन्ही पावडर एकत्र करुन रोज अर्धा चम्मच गरम दुधात मिसळून पिणे वजन वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. मात्र याचे दररोज सेवन करण्याबरोबरच तुम्ही व्यायाम करणे देखील गरजेचे आहे.

'हे' आहेत अश्वगंधाचे फायदे

1. रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

2. निद्रानाशाच्या समस्येचा सामना करत असाल तर त्यापासूनदेखील दूर ठेवते.

3. थकवा दूर करते.

4. अशुद्ध रक्त शुद्ध करण्यास मदत करते.

5. पचनसंस्था सुधारण्यास मदत करते.

Ashwagandha-Shatavari Benefits
Garlic Tea: सर्दी खोकल्याला पळवणारा अन् मधुमेहींसाठी फायदेशीर चहा

शतावरीचे 'हे' आहेत फायदे

1. आयुर्वेदात महिलांसाठी शतावरी उत्तम मानली जाते. मात्र स्री आणि पुरुषांसाठी दोन्हींसाठी शतावरी फायदेशीर ठरते.

2. वजन वाढण्यात मदत होते.

3. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे, त्यांच्यासाठीदेखील शतावरी फायदेशीर ठरते.

4. खोकल्यावर प्रभावी मानली जाते.

त्यामुळे शतावरी आणि अश्वगंधा एकत्र मिळून आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. मात्र कोणत्याही आजारांमध्ये वापरण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com