Anushka Fitness Mantra: अनुष्का शर्मा इतकी फिट कशी? अभिनेत्रीने सांगितली तिच्या जेवणाबाबत खास गोष्ट, म्हणाली...

सेलिब्रिटी स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतात.
Anushka Sharma Fitness Mantra
Anushka Sharma Fitness MantraDainik Gomantak

Anushka Sharma Fitness Mantra: सेलिब्रिटी स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतात. शरीराला परफेक्ट शेपमध्ये ठेवण्यासाठी ते अनेक पद्धतींचा अवलंब करतात. त्यांचा फिटनेस पाहून आपल्या सर्वांना त्यांच्यासारखे व्हायचे असते, पण ते जे करतात ते आपण सर्वजण करतो का?

सर्वात फिट अभिनेत्रींमध्ये अनुष्का शर्माचे नाव देखील आहे. आई झाल्यानंतरही तिने कठोर परिश्रम करून तिची शरीरयष्टी पुन्हा पूर्वीसारखी केली आहे. यामागचे कारण म्हणजे तिची डिनरची वेळ. एका कार्यक्रमादरम्यान, जेव्हा अनुष्काने तिची जेवणाची वेळ सांगितली तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले. याचा अंदाजही लावणे कठीण आहे.

Anushka Sharma Fitness Mantra
तुम्हालाही कतरिना कैफसारखी स्लिम आणि फिट फिगर हवी? मग फॉलो करा तिने सांगितलेल्या 'या' गोष्टी

अनुष्का शर्माने इतक्या लवकर डिनर करते

अनुष्का शर्मा पती विराट कोहलीसोबत एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती. ती एकदम फिट दिसत होती. दरम्यान, तिला तिच्या फिटनेसबद्दल विचारले असता तिने सांगितले की, ती संध्याकाळी 5:30 ते 6 पर्यंत जेवण करते आणि कोणत्याही परिस्थितीत रात्री 9:30 पर्यंत झोपते. ती ही सवय अनेक वर्षांपासून पाळत आली आहे

अनुष्का शर्मा दुपारचे जेवण कधी करते?

तिच्या जीवनशैलीबद्दल बोलताना अनुष्का शर्मा म्हणते की, तिने तिच्या खाण्याच्या वेळेत पूर्णपणे बदल केला आहे. तिचे दुपारचे जेवण सकाळी 11 ते 11:30 पर्यंत असते. ती रात्रीचे जेवणही लवकर करते. यातून तिला एक नाही तर अनेक फायदे मिळतात.

सूर्यास्तापूर्वी रात्रीचे जेवण करण्याचे जबरदस्त फायदे

  • शरीर अधिक रिलॅक्स होते

  • झोप चांगली लागते

  • झोपेच्या समस्या दूर होतात

  • सकाळी उठल्यानंतर ताजेतवाने वाटते.

  • ऊर्जा वाढते

  • फोकस आणि विचार स्पष्ट होतात

अनुष्का शर्माचा फिटनेस मंत्र

प्रत्येकाने सेलिब्रेटींना आंधळेपणाने फॉलो करणे टाळावे, असे अनुष्का शर्माने सांगितले आहे. फक्त तुमच्यासाठी सर्वोत्तम आहार आणि कसरत निवडा. कारण प्रत्येक व्यक्तीचे शरीर, आरोग्य स्थिती आणि शारीरिक हालचाली नेहमीच भिन्न असतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com