Anti-Valentine's Week 2024: 'व्हॅलेंटाईन डे' नंतर 'स्लॅप डे' पासून 'ब्रेकअप डे' कधी..., जाणून घ्या एका क्लिकवर

लोक 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. पण दुसऱ्याच दिवशी 15 फेब्रुवारीपासून अँटी-व्हॅलेंटाईन वीक सुरू होतो. अँटी व्हॅलेंटाईन वीकमध्ये कोणते दिवस येतात ते जाणून घेऊया.
Anti-Valentine's Week 2024
Anti-Valentine's Week 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Anti-Valentine's Week 2024 slap day to breakup day know full list

जे लोक 7ते 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाइन वीक म्हणून जोडीदारांसह साजरा करतात. मात्र, हा प्रेमाचा आठवडा संपला की अँटी व्हॅलेंटाईन वीक सुरू होतो.असे म्हणतात की जर तुम्ही 14 फेब्रुवारी पास झालात तर तुमचा क्रश तुमचा व्हॅलेंटाईन बनतो पण जर तुम्ही अयशस्वी झालात तर तुम्हाला अँटी व्हॅलेंटाईन वीकचा सामना करावा लागतो. सिंगल लोक 15 फेब्रुवारीपासून अँटी व्हॅलेंटाईन वीक देखील साजरा करतात. या आठवड्यात कोणते दिवस येतात हे जाणून घेऊया.

15 फेब्रुवारी- स्लॅप डे

अँटी व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्या दिवस स्लॅप डे म्हणून साजरा केला जातो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या जोडीदाराला मारावे, उलट तुमच्या भावनांना सांगून नात्यातून बाहेर पडावे.

16 फेब्रुवारी - किक डे

जर तुम्ही अशा नात्यातून जात असाल ज्यामध्ये खूप समस्या आहेत, तर या दिवशी तुमच्या भूतकाळाला विसरा आणि नवीन सुरुवात करा.

17 फेब्रुवारी-परफ्यूम डे

परफ्यूम डे 17 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही स्वतःसाठी परफ्यूम खरेदी करू शकता. त्याचा सुगंध जीवनात नवा सुगंध देईल. तसेच, हा सुगंध तुम्हाला जुन्या आठवणी विसरण्यास आणि छान वाटण्यास मदत करेल.

18 फेब्रुवारी-फ्लर्टिंग डे

हा दिवस तुम्हाला नवीन लोकांना भेटण्याची संधी देतो. जर तुमचे नुकतेच ब्रेकअप झाले असेल आणि तुम्हाला भूतकाळातून बाहेर पडायचे असेल तर हा दिवस सर्वोत्तम आहे. या दिवशी नवीन लोकांना भेटा.

19 फेब्रुवारी- कन्फेशन डे

जर तुम्ही तुमच्या नात्यात आनंदी नसाल आणि तुमच्या जोडीदारासोबत बराच काळ ब्रेकअप करण्याच्या मूडमध्ये असाल, तर तुम्ही कन्फेशन डेच्या दिवशी त्यांच्यासमोर कबुली देऊ शकता. याशिवाय या दिवशी आपल्या चुका मान्य करू शकता.

20 फेब्रुवारी-मिसिंग डे

ब्रेकअपनंतर तुम्ही तुमच्या जोडीदाराला मिस करत असाल तर या दिवशी तुम्ही त्यांना सांगू शकता की तुम्ही त्यांना किती मिस करत आहात.

21 फेब्रुवारी - ब्रेकअप डे

अँटी व्हॅलेंटाईन वीकचा शेवटचा दिवस ब्रेकअप डे म्हणून सादरा केला जातो. जर तुमचं नातं खूप टॉक्सिक झाले असेल आणि तुम्हाला त्या नात्यात पुढे जायचे नसेल, तर ब्रेकअप डे ला सांगू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com