Amalaki Ekadashi 2024: आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याशी संबंधित करा 'हे' उपाय करा, दूर होतील आर्थिक समस्या

Amalaki Ekadashi 2024: आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याशी संबंधित काही उपाय केल्यास आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते.
Amalaki Ekadashi 2024
Amalaki Ekadashi 2024Dainik Gomantak

Amalaki Ekadashi 2024 vastu remedies for money problem happiness read full story

एकादशी तिथीला हिंदू धर्मात खास महत्त्व आहे. एकादशीचा दिवस भगवान विष्णूची मनोभावे पुजा करणे शुभ मानले जाते. यंदा 20 मार्च रोजी आमलकी एकादशी साजरी केली जात आहे. याला रंगभरी एकादशी आणि आवळा एकादशी असेही म्हणतात. आज फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशी आहे. अमलकी एकादशीच्या दिवशी आवळा वृक्षाचे इतर काही उपाय करणे शुभ मानले जाते.

आमलकी एकादशीला करा पुढील उपाय

जीवनात सुख-शांतीसाठी आवळा एकादशीच्या दिवशी आवळा वृक्षाची पूजा करावी. सकाळी उठून आंघोळ वगैरे करून आवळा झाडाच्या मुळास दूध अर्पण करावे. तसेच झाडाला फुले, अक्षत अर्पण करावे. झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घाला.

आज आमलकी एकादशीच्या दिवशी घरात आवळ्याचे झाड लावावे. असे करणे शुभ मानले जाते. आवळ्याच्या झाडात माता लक्ष्मी वास करते असे मानले जाते. आवळ्याच्या मुळाला पाणी अर्पण केल्याने धनसंपत्ती वाढते.

एक आवळा पाण्यात ठेवा आणि नंतर हे पाणी घरात चारही बाजूंनी शिंपडावे. घरात पाणी शिंपडताना 'ओम नमो भगवते वासुदेवाय नमः' या मंत्राचा जप करावा. हा उपाय केल्याने घरात सुख-शांती नांदते आणि घरगुती त्रास दूर होतात.

आमलकी एकादशीचे व्रत ठेवा आणि भगवान विष्णूला आवळा अर्पण करावा. असे करणे शुभ मानले जाते. यामुळे भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर हा उपाय नक्की करावा.

संततीप्राप्तीसाठी आमलकी एकादशीच्या दिवशी पूजा आणि उपवास करावा. यासाठी व्रत ठेवावा आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. मूल होण्यासाठी हे उपाय करता येतात.

आमलकी एकादशीला पूजेदरम्यान या मंत्रांचा जप करावा. मंत्राचा जप केल्याने लवकरच सकारात्मक परिणाम दिसतात.

ॐ नारायणाय विद्महे । वासुदेवाया धीमहि । तन्नो विष्णु प्रचोदयात् ।

ओम ह्रीं कार्तवीर्यर्जुनो नम राजा बाहु सहस्त्रवां । यस्य स्मरेण मात्रेन ह्रतं नष्टं च लभ्यते ।

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com