Almond Peels Benefits: बदामाची साल फेकून न देता असा करा उपयोग

Almond Peels Benefits: यामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे केसांना स्पा चे फायदे मिळतात.
Almond Peels Benefits
Almond Peels BenefitsDainik Gomantak

Almond Peels Benefits: बदाम आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. आपल्या शरीरातील अनेक घटकांची पूर्तता बदाम करत असल्याचे तज्ञांकडून सांगितले जाते. अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन्सचे मुबलक प्रमाण असलेले बदाम रात्री पाण्यात भिजत घालून आपण ते सकाळी त्याची साल काढून त्याचे सेवन करतो. मात्र तुम्हाला माहीती आहे का बदामाच्या सालीचादेखील उपयोग केला जाऊ शकतो.

१. झाडांचे खाद्य म्हणून होतो उपयोग

बदामाच्या सालीमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात जे झाडांची वाढ वाढवण्याचे काम करतात. अशा परिस्थितीत बदामाची साले गोळा करून उन्हात वाळवा, बारीक करून पावडर बनवा आणि आठवड्यातून एकदा एक चमचा पाण्यात मिसळून झाडांच्या मुळांवर लावा. ते तुमच्या बागेला एका आठवड्यात हिरवेगार बनवू शकतात. झाडांचे खाद्य म्हणून बदामाच्या सालीचा उपयोग केला जाऊ शकतो.

२. हेअर मास्क

दुकानात मिळणारे ब्रँडेड हेअर मास्क खूप महाग असतात, त्यामुळे ते खरेदी करण्यापूर्वी खूप विचार करावा लागतो. अशावेळी तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतींनी बदामाच्या सालीचा हेअर मास्क तयार करू शकता. यासाठी अर्धा कप साल घ्या आणि मिक्सरमध्ये एक अंडे, 1 चमचे खोबरेल तेल, 2 चमचे एलोवेरा जेल आणि मध घालून बारीक करा. आता ही पेस्ट गाळून केसांना लावा. यामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे केसांना स्पा चे फायदे मिळतात.

३. बॉडी वॉश

तुम्हाला बॉडी वॉश पुन्हा पुन्हा विकत घेण्याचा त्रास टाळायचा असेल तर तुम्ही बदामाच्या सालीपासून ते घरी बनवू शकता. एवढेच नाही तर बॉडी वॉशपेक्षा तुमच्या त्वचेची चमक वाढवण्यासाठी हे जास्त काम करेल.

अशा परिस्थितीत, ते बनवण्यासाठी तुम्हाला गुलाबजल, मध, 1 कप बदामाची साले, 2 चमचे दूध आणि पाणी लागेल. या सर्व गोष्टी एका वाटीत मिक्स करा आणि थोडा वेळ भिजवून ठेवा. तुम्ही ते बारीक वाटून देखील घेऊ शकता. आता हे मिश्रण बॉडी वॉश आणि स्क्रब म्हणून वापरा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com