Air Pollution Effects Eyes: प्रदुषणामुळे डोळ्यांमध्ये जळजळ होत असेल तर करा 'हे' 5 उपाय

वाढत्या प्रदुषणामुळे डोळ्यांना जळजळ होत असेल तर तुम्ही पुढिल टिप्स फॉलो करू शकता.
Air Pollution Effects Eyes
Air Pollution Effects EyesDainik Gomantak
Published on
Updated on

Air Pollution Effects Eyes: हवामानातील बदलामुळे हवेची गुणवत्ताही झपाट्याने खालावू लागते. याचे कारण हिवाळ्याच्या आगमनाबरोबरच काही ठिकाणचे प्रदूषण हे हवेत विषारी करण्याचे काम करते. 

त्यामुळे प्रदूषणाची पातळी जसजशी वाढत जाते तसतसे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या वाढत आहेत. श्वासोच्छवासाच्या त्रासापासून डोळ्यात जळजळ, खाज सुटणे आणि लालसरपणा वाढत आहे. 

काहीच्या डोळ्यात पाणीही येऊ लागते. ही हवा डोळ्यांसाठी अत्यंत हानिकारक आहे. हे टाळण्यासाठी काही उपाय आहेत. जे करून तुम्ही तुमच्या डोळ्यांचे या विषारी हवेपासून संरक्षण करू शकता. जर तुम्ही या हवेच्या सतत संपर्कात असाल तर यामुळे डोळ्यांशी संबंधित आजार देखील होऊ शकतात, ज्यामुळे दृष्टीवर परिणाम होतो. यामुळे डोळ्यांची कसी काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

थंड पाण्याने डोळे धुवावे

थंडीच्या दिवसांमध्ये डोळ्यांना खाज सुटणे आणि जळजळ होणे ही एक सामान्य समस्या आहे. यापासून आराम मिळवण्यासाठी थंड पाण्याने डोळे धुणे हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. यामुळे डोळ्यातील जळजळ आणि धूळ साफ होते. डोळ्यांच्या खाज सुटण्यापासूनही आराम मिळतो. यासाठी दिवसातून किमान दोन ते तीन वेळा डोळे थंड पाण्याने स्वच्छ धुवावेत. हे धुळीचे कण काढून टाकण्यास मदत करते. यामुळे डोळ्यांची जळजळ कमी होते.

लॅपटॉपचा वापर कमी करावा
आजच्या काळात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत बहुतेक लोक त्यांच्या दिवसाचा बराचसा वेळ टीव्ही, लॅपटॉप आणि मोबाईल स्क्रीन पाहण्यात घालवतात. ते सतत पाहिल्याने डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. यासोबतच प्रदूषणामुळे ही समस्या एवढी वाढली आहे की लाइटिंगवरही परिणाम होऊ लागतो. तसेच, डोळ्यांमध्ये वेदना होऊ शकते आणि सूज येऊ शकते. हे टाळण्यासाठी डोळ्यांना जास्तीत जास्त विश्रांती द्यावी. 

बर्फाचा वापर

जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांमध्ये जास्त खाज सुटण्याची आणि जळजळ होण्याची समस्या येत असेल तुम्ही बर्फाचा वापर करू शकता. यासाठी एका सुती कपडामध्ये बर्फाचा तुकडा ठेवा आणि डोळ्यांना लावावा. असे केल्याने डोळ्यांना थंडावा मिळतो आणि होणारी जळजळ आणि खाज सुटण्यापासून आराम मिळतो. 

काकडी आणि बटाट्यांचा वापर

प्रदूषणामुळे डोळ्यात धुळ जाते तसेच तासन्तास मोबाईल स्क्रीन पाहिल्याने जळजळ आणि वेदना होतात. त्यामुळे डोळ्यांवर सूजही येऊ शकते. हे टाळण्यासाठी डोळे थंड पाण्याने धुवावे. यानंतर काकडी आणि बटाटे कापून बाजूला ठेवावे. यामुळे लगेच आराम मिळेल. 

बाहेर जाताना चष्मा वापरावा

डोळ्यांना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी चष्मा वापरावा. यामुळे तुमच्या डोळ्यांचे हवेपासून आणि त्यातील कणांपासून रक्षण होईल. यामुळे डोळे सुरक्षित राहतील.  तसेच प्रदूषणामुळे होणाऱ्या समस्यांना आळा बसू शकतो. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com