Alert: AI चा वापर करून आवाजाची नक्कल; आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी लक्षात ठेवा 'या' गोष्टी

सायबर फसवणूक करणारे आर्टिफिशिअल इंटेलिजेंसचा (AI) वापर करून मोठ्या प्रमाणावर लोकांची फसवणुक करत आहेत.
AI Voice Scam
AI Voice ScamDainik Gomantak

Alert: सायबर फसवणूक करणारे आर्टिफिशिअल इंटेलिजेंसचा (AI) वापर करून मोठ्या प्रमाणावर लोकांची फसवणुक करत आहेत. AI वापरून सायबर फसवणूक करणारे लोक फसवणूक करण्यासाठी त्यांना त्यांचे खास मित्र किंवा नातेवाईकांशी संपर्क करतात.

यादरम्यान, ते एआयच्या मदतीने आपला आवाज आणि चेहरा बदलून सामान्य कॉल आणि व्हिडिओ कॉलवर बोलतात. ज्यामुळे पीडिताला असे वाटते की कॉलवरील व्यक्ती आपल्या ओळखीची कोणीतरी आहे.

  • एआय व्हॉईस कॉल स्कॅमपासून कसा बचाव करणार

एआयच्या मदतीने आवाज बदलून लोकांची फसवणूक करण्यासाठी हॅकर्स अनेकदा तुमच्या जवळच्या मित्रांचा किंवा नातेवाईकांचा आवाज वापरतात. ते फोनवर एखादी अडचणीची परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगून ते पैशांची किंवा अन्य मागणी करू शकतात. असा फोन आल्यास घाबरू नका आणि तुमच्या जवळच्या नातेवाईकाशी फोनवरून संपर्क साधा. जेव्हा तुम्हाला असा कॉल येतो तेव्हा शक्य तितक्या वेळ बोलण्याचा प्रयत्न करा आणि इतर नातेवाईकांबद्दल विचारपुस करत राहावी.

  • AI Video Call किंवा Message Scams कसे टाळाल

एआय व्हिडिओ कॉल किंवा मॅसेजद्वारे फसवणूक करण्यासाठी, फसवणूक करणारे लोक एआयद्वारे त्यांच्या नातेवाईकाच्या चेहऱ्याचे क्लोनिंग करून व्हिडिओ बनवतात आणि ते अडचणी असल्याचे सांगून पैसे मागतात. अशी फसवणूक टाळण्यासाठी, जेव्हाही तुम्हाला असा व्हिडिओ कॉल येतो तेव्हा त्या व्यक्तीच्या ओठांकडे आणि ते डोळे मिचकावण्याकडे लक्ष द्यावे. याच्या मदतीने तुम्ही खोटे आणि खरे व्हिडिओ ओळखू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com