AC मधून निघणाऱ्या पाण्याचा घरगुती कामांसाठी करू शकता वापर

जर तुम्हीही एसीमधून बाहेर पडणारे पाणी फेकून देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
AC
ACDainik Gomantak
Published on
Updated on

AC: एसीमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याचे काय करावे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. अनेक लोक एसीचे पाणी खराब असते असे समजून बाहेर फेकून देतात. एसीमधून बाहेर पडणारे पाणी डिस्टिल वॉटर असते. ज्याचा वापर तुम्ही अनेक घरगुती कामासाठी करू शकता.

एसीमधून निघमारे पाणी डिस्टिल्ड वॉटर असले तरी ते इन्व्हर्टरमध्ये टाकु नका. एसीमधून निघणाऱ्या पाण्याचा कसा वापर करावा हे जाणून घेऊया.

  • कपडे धुण्यासाठी

जर कपड धुताना नळातील पाणी संपले तर टेंशन घेऊ नका. एसी मधून बाहेर निघणाऱ्या पाणी तुम्ही कपडे धुण्यासाठी वापरू शकता.

  • कार स्वच्छ कराण्यासाठी वापर

एसीमधून निघणारे पाणी स्वच्छ असते. यामुळे तुम्ही बाइक किंवा कार धुण्यासाठी वापरू शकता . या पाण्याने कारच्या आतील भाग स्वच्छ करू शकता.

AC
Weekend Recipe: वीकेंडला बनवा स्पेशल, नाश्त्यात घ्या खमंग, कुरकुरित कोथिंबीर वडीचा आस्वाद
  • झाडांना पाणी देण्यासाठी वापर

झाडांना पाणी देण्यासाठी एसीमधून निघणाऱ्या पाण्याचा वापर करू शकता. हे पाणी वापरणे झाडांसाठी सुरक्षित मानले जाते. तुमच्या घरातील एसीमधून जास्त पाणी येत असेल तर ते वाया न जाऊ देता घरातील कुंड्यांमध्ये टाकावे.

  • घराच्या स्वच्छतेसाठी वापर

तुमच्या घरातील एसीच्या पाण्याता वापर फरशी पुसण्यासाठी करू शकता. तसेच टॉयलेट स्वच्छ करण्यासाठीही हा या पाण्याचा वापर करू शकता. यामुळे तुम्ही पाण्याची बचत देखील करू शकता.

  • स्टीम आयरन करण्यासाठी वापर

तुम्हाला जर स्टीम आयरन करायचे असेल तर वेगळे पाणी न वापरता तुम्ही एसीमधून निघणारे पाणी वापरू शकता. यासाठी तुम्हाला दुसरे पाणी वापरण्याची गरज पडणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com