Bad Food For Health
Bad Food For HealthDainik Gomantak

Food For Health: 'हे' पाच पदार्थ शरीरासाठी धोकादायक; खाणे टाळाच

Food For Health: त्यामुळे प्रक्रिया करुन साठवलेल्या मासांहाराचा वापर कमीत कमी करुन ताज्या मासांहराचे प्रमाण वाढले पाहिजे.
Published on

Food For Health: आपण आपल्या रोजच्या दैनंदीन जीवनात अनेक चुकीच्या पद्धतीचा अवलंब करत असतो. जसे की, आपण आपल्या आहारात असे पदार्थ खातो ज्याचा आपल्या शरीरावर अत्यंत वाईट परिणाम होत असतो. आज आपण जाणून घेऊयात असे कोणते पदार्थ आहेत जे खाल्याने त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.

अनेक आरोग्यतज्ञांनी दिलेल्या माहीतीनुसार, असे पाच पदार्थ आहेत ज्या वापर आपण आहारात करणे टाळले पाहिजे.

१. साखर असलेले पदार्थ

२. प्रक्रिया केलेला मासांहार

३. पाम तेल

४. डेअरी प्रोडक्ट

५. सोडा

जाणून घेऊयात या पदार्थाचा आपल्या शरिरावर काय तोटा होतो:

१. साखर असलेले पदार्थ

काहींना गोड खाल्ल्याशिवाय दिवस जात नाही. अनेक खाद्यपदार्थात साखर असते, परंतु जेव्हा तुम्ही कृत्रिम साखर किंवा जास्त साखरचे असलेले पदार्थ खातात तेव्हा शरीरात जळजळ सुरू होते. हे प्रक्रिया केलेले साखरेचे पदार्थ हळूहळू मधुमेह आणि अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते.

२. प्रक्रिया केलेला मासांहार

मासांहार अनेकांच्या रोजच्या आहाराचा भाग असतो. मात्र प्रक्रिया करुन साठवून ठेवलेले मासांहार आपल्या आरोग्यावर परिणाम करतात. मिळालेल्या माहीतीनुसार यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. त्यामुळे प्रक्रिया करुन साठवलेल्या मासांहाराचा वापर कमीत कमी करुन ताज्या मासांहराचे प्रमाण वाढले पाहिजे.

Bad Food For Health
Milk Facepack: नितळ त्वचेसाठी दुधावरील साय ठरेल गुणकारी! बनवा 'हे' 3 फेसपॅक

३. पाम तेल

पाम तेलाचा वापर जेवणात करू नये. आरोग्यासाठी हे तेल धोकादायक मानले जाते. यातील सॅच्युरेटेड फॅट्स जे कोलेस्टेरॉल वाढवून तुमचे हृदयाची प्रक्रिया आणि मेंदूचे काम थांबवू शकतात.

४. डेअरी प्रोडक्ट

दुग्धजन्य पदार्थांच्या अतिवापरामुळे हृदय( Heart ) व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होऊ शकतात. परंतु असे पदार्थ कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वे समृध्द असतात, त्यामुळे तुमच्या डॉक्टरांनी परवानगी दिल्यास ते कमी प्रमाणात सेवन केले जाऊ शकतात.

५. सोडा

आजकाल सोडा पिण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. मात्र या सोड्यामुळे आपल्या आरोग्या( Health ) संबंधी अनेक आजारांना सामोरे जावे लागते. जेवन करताना चूकूनही सोडा न पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामुळे हाडांवर परिणाम होत असतो. यातील फॉस्फोरिक अॅसिड दात आणि हाडे खराब करू शकते आणि ऑस्टिओपोरोसिस होऊ शकते.

जर तुम्ही कोणत्या आजारांचा सामना करत असाल तर तुम्ही तुमच्या आरोग्यतज्ञांचा सल्ला घेऊ शकता आणि आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com