गुलमर्ग हे जगातील सर्वोत्तम स्कीइंग ठिकाणांपैकी एक आहे. याशिवाय, हिवाळ्यात ते पूर्णपणे बर्फाच्या चादरीने झाकलेले असते. साहसप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही.
गोवा प्रत्येकाच्या बकेट लिस्टमधील नाव आहे. पालोलेम आणि मंद्रेम इत्यादी सुंदर समुद्रकिनारे या व्यतिरिक्त तुम्ही स्थानिक चर्चला भेट देऊ शकता आणि स्वादिष्ट पदार्थांचा (New Year Places) आनंद घेऊ शकता.
पुद्दुचेरीच्या समुद्रकिनाऱ्यावर नवीन वर्ष साजरे केले जाऊ शकते. दरवर्षी सुट्टीच्या काळात लोक येथे येतात. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला रात्रभर आतषबाजी होते. येथील दृश्य अतिशय सुंदर आणि पाहण्यासारखे आहे.
कच्छचे रण हे निसर्गप्रेमींसाठी हिवाळ्यात भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. या ठिकाणी तुम्ही कुटुंबासह (Friends Planning Trip) नवीन वर्ष साजरे करू शकता.
कूर्ग हे भारताचे स्कॉटलंड म्हणूनही ओळखले जाते. कुर्ग हे भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. धबधबे हे येथील प्रमुख आकर्षण आहे.
उदयपूर तलावांचे शहर, भारतातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हिवाळ्यात इथलं वातावरण आल्हाददायक होतं. चमचमणारे तलाव तुम्हाला मंत्रमुग्ध करतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.