लोकं दरवर्षी त्यांच्या आवडत्या ठिकाणांना (Places) जाण्याचा प्लॅन (Plan) करतात. जगभरात अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत. जिथे दरवर्षी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. परंतु कोरोना माहामारीमुळे अनेक ठिकाणी लॉकडाउन (Lockdown) असल्याने पर्यटनावर बंदी घालण्यात आली होती. पण पुन्हा एकदा जगात जवळपास सर्व पर्यटन स्थळे (Tourist places) खुली करण्यात आली आहेत. अधिक माहिती जाणून घेऊया अशा ठिकाणाबद्दल.
* नॉसवांस्टाइन कॅसल
जर्मनीमध्ये असलेला नॉसवांस्टाइन कॅसल हा राजवाडा सर्वात जुना आहे. 1864 मध्ये बावरियाचा राजा लूडविज - 2 याच्या आदेशद्वारे राजवाडा बांधण्याचा आदेश देण्यात आला असे म्हटले जाते. परंतु दुर्दैवाने या राजवड्याचे काम कधीच पूर्ण झाले नाही. तथापि येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देण्यासाठी येतात, कारण या राजवाड्याचे सौंदर्य लोकांना मोहित करते.
* चीनची भिंत
संपूर्ण जगात चीनच्या भिंतीला ' ग्रेट वॉल ऑफ चायना' या नावाने ओळखले जाते. ही भिंत जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. याचे कारण म्हणजे ही भिंत जगातील सर्वात लांब भिंत आहे. याची लांबी 8,850 किमी असल्याचे सांगितले जाते. या ठिकाणाला एकदा तरी नक्की भेट द्या.
* मिस्र पिरॅमिड
गीजाचे पिरॅमिड हे जगातील पहिले आश्चर्य मानले जाते. असे बोलल्या जाते की, प्राचीन इजिप्त राजांचे मृतदेह या पिरॅमिडमध्ये सुरक्षित ठेवले आहेत. असे मानले जाते की हे पिरॅमिड इ. स. पू. 2560च्या आसपास बांधल्या गेला होता. परंतु अजूनही यामागील सत्य उलगडलेले नाही. याच कारणामुळे जगभरातील लोक आकर्षित होतात.
* इंद्रधनुष्य पर्वत
पेरूमधील या जागेला इंद्रधनुष्याचे पर्वत म्हणून ओळखले जाते. येथील रंगीबेरंबी पर्वत पाहून एका वेगळ्याच्या विश्वात आल्यासारखे वाटते. दुरदूरवरुन पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.