दरवर्षी 12 जुन हा दिन 'बालमजुरीविरुद्ध जागतिक दिन' म्हणुन साजरा केला जातो.
बालमजुरीविरुद्ध जागतिक दिनाचे उद्दिष्ट बालमजुरीविरुद्ध जगभरातील चळवळीला चालना देण्याचा आहे.
14 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना कामावर ठेवल्यास सहा महिने ते दोन वर्षे कारावास आणि 20 हजार ते 50 हजार रुपये दंड आहे.
कायद्यानुसार 14 वर्षांखालील मुलांना नोकरी देता येत नाही. चाइल्डलाइन केअर अँड प्रोटेक्शन अंतर्गत गरजू मुलांसाठी मोफत आपत्कालीन फोन 1098 सेवा 24 तास उपलब्ध आहे.
महिला व बालविकास विभागाच्या संचालिका रुपाली ठाकूर सांगतात की, बालमजुरी रोखण्यासाठी सातत्याने तपासणी केली जात आहे. जिथे मुले बालमजुरी करताना आढळून येतात, त्यांची सुटका करून त्यांना नातेवाइकांच्या ताब्यात देण्याबरोबरच बालआश्रमात त्यांना शिक्षणही दिले जाते.
2002 मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने बालमजुरीविरुद्ध जागरुकता वाढवणे आणि त्याला संपविण्याच्या उद्देशाने बालकामगार विरुद्ध जागतिक दिवस सुरू केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.