Dalai Lama: वाढदिवसाच्या दिवशी दलाई लामा करणार उत्तराधिकाऱ्याची घोषणा?

Dalai Lama
Dalai LamaDainik Gomantak
Published on
Dalai Lama
Dalai LamaDainik Gomantak

तिबेटी धर्मगुरु दलाई लामा: तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांचा 90 वा वाढदिवस जवळ येत आहे. यासोबतच त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबतही उत्सुकता वाढत आहे.

Dalai Lama
Dalai LamaDainik Gomantak

90 वर्षांचे होणार: दलाई लामा 6 जुलै रोजी 90 वर्षांचे होतील. या निमित्ताने ते तिबेटी जनतेसाठी आपला उत्तराधिकारी घोषित करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Dalai Lama
Dalai LamaDainik Gomantak

नवा उत्तराधिकारी: नवा उत्तराधिकारी दलाई लामा यांच्या समुदायाचा नेता असेल. एवढचं नाहीतर चीनच्या दडपशाही धोरणांविरुद्धही प्रतीक असेल. चीनने तिबेटचा ताबा घेतल्यापासून दलाई लामांचे सिंहासन प्रतिकात्मक का असेना, त्याविरुद्धचा प्रतिकाराचा आवाज आहे.

Dalai Lama
Dalai LamaDainik Gomantak

कठीण आव्हान: नव्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा करणं इतकं सोपं असणार नाही, कारण दलाई लामा यांच्यानंतर तिबेटीयन बौद्ध व्यवस्थेतील दुसरी सर्वात महत्त्वाची आध्यात्मिक व्यक्ती पंचेन लामा चीनच्या ताब्यात आहेत.

Dalai Lama
Dalai LamaDainik Gomantak

पंचेन लामा: दलाई लामा आणि पंचेन लामा एकत्र असते तर उत्ताराधिकाऱ्याचे संकट उद्भवले नसते. परंपरेनुसार, दलाई लामा आणि पंचेन लामा एकमेकांच्या पुनर्जन्माची घोषणा करुन अंतिम शिक्कामोर्तब करतात.

Dalai Lama
Dalai Lama

चीनचा विरोध: दलाई लामा यांच्या निर्णयाला चीन नेहमीच विरोध करत आला आहे. चीनी कम्युनिस्ट राजवटीच्या संमतीने ही घोषणा चीनच्या मातीतून व्हायला हवी असे चीनचे म्हणणे आहे. या गोष्टींमुळे हा प्रश्न गुंतागुंतीचा होतो.

Dalai Lama
Dalai LamaDainik Gomantak

पुनर्जन्म: द टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, तथापि, तिबेटमधील निर्वासित सरकारमधील काही लोकांचा असा विश्वास आहे की दलाई लामा हे देखील जाहीर करु शकतात की त्यांच्यानंतर दलाई लामांचा पुनर्जन्म होणार नाही.

Dalai Lama
Dalai LamaDainik Gomantak

110 वर्षे जगणार: तथापि, काही लोकांचे असेही म्हणणे आहे की, दलाई लामा यांना त्यांचे उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्याची गरज नाही कारण त्यांनी स्वतः घोषित केले आहे की, ते 110 वर्षे जगतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com