हिजाब घालण्याचे नियम काय? नकाब, बुरखा, दुपट्टा यापेक्षा वेगळे कसे?

इस्लाममध्ये केवळ हिजाबच नाही तर बुरखा, नकाब इत्यादींसह इतर अनेक प्रकारचे कपडे घालण्याची परंपरा आहे.
What are rules for wearing hijab?
What are rules for wearing hijab?Dainik Gomantak
Published on
Updated on
What are rules for wearing hijab?
What are rules for wearing hijab?Dainik Gomantak

कर्नाटकात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या हिजाब वादावर कर्नाटक उच्च न्यायालयाने आपला निकाल दिला आहे . शाळा-कॉलेजमध्ये हिजाब घालणे आवश्यक नाही, असे हायकोर्टाने म्हटले आहे. यासोबतच हिजाबवरील बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकाही फेटाळण्यात आल्या आहेत. हिजाब इस्लामचा अविभाज्य भाग नाही आणि त्यावर बंदी घालण्याबाबत विद्यार्थी कोणताही आक्षेप नोंदवू शकत नाही असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. तेव्हापासून हिजाबबाबत सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत असून अनेक लोक यावर भाष्य करत आहेत.

What are rules for wearing hijab?
What are rules for wearing hijab?Dainik Gomantak

इस्लाममध्ये केवळ हिजाबच नाही तर बुरखा, नकाब इत्यादींसह इतर अनेक प्रकारचे कपडे घालण्याची परंपरा आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला हिजाब, बुरखा, नकाब, दुपट्टा इत्यादी काय आहेत आणि ते एकमेकांपासून कसे वेगळे आहेत ते सांगणार आहोत. ते परिधान करण्याबाबत काय नियम आहेत ते देखील जाणून घ्या.

What are rules for wearing hijab?
What are rules for wearing hijab?Dainik Gomantak

हिजाब म्हणजे काय?

हिजाब नकाब, बुरखा इत्यादींपेक्षा खूप वेगळा आहे. हिजाबचा अर्थ पडदा असा होतो. कुराणमध्ये हिजाब म्हणजे स्त्री-पुरुषा दरम्यान असणारा पडदा असे मानले जाते. त्याच वेळी, जो हिजाब तुम्ही परिधान करता त्याने तुमचे केस पूर्णपणे झाकले पाहिजे, त्याला हिजाब म्हणजे डोके झाकणे असे म्हणतात. महिलांचे डोके आणि मान कोणत्याही कपड्याने झाकण्याला हिजाब म्हणतात, परंतु महिलांचा चेहरा दिसतो. म्हणजेच हिजाबमध्ये केस, कान, घसा झाकण्यास सांगितले जाते, परंतु चेहरा दिसतो.

What are rules for wearing hijab?
What are rules for wearing hijab?Dainik Gomantak

नकाब - हा एक प्रकारचा कापडा आहे ज्याद्वारे चेहरा लपविला जातो. जो डोक्यावर आणि चेहऱ्यावर लावला जातो. त्यात महिलेचा चेहराही दिसत नाही. पण यामध्ये डोळे झाकले जात नाहीत. मात्र हा नकाब संपुर्ण चेहऱ्यावर बांधला जातो. साधारणपणे हा काळा रंगाच्या कपडा असतो जो पीनच्या मदतीने बांधलेला असतो.

What are rules for wearing hijab?
What are rules for wearing hijab?Dainik Gomantak

बुरखा- भारतात सहसा मुस्लिम महिला बुरखा परिधान करतात. जो एखाद्या चोळीसारखा असतो, ज्यामध्ये महिलांचे शरीर पूर्णपणे झाकलेले असते. यामध्ये डोक्‍यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर झाकण्यासोबतच डोळ्यांवर देखील पडदा टाकता येतो. यासाठी डोळ्यांसमोर जाळीचे कापड ठेवले जाते. यामुळे मुस्लिम धर्माच्या स्त्रियांना बाहेर पडता येते. यामध्ये महिलेच्या शरीराचा कोणताही भाग दिसत नाही. अनेक देशांमध्ये याला अबाया असेही म्हणतात. याचा रंग एकसारखा असतो ज्यामुळे परपुरुष महिलांकडे आकर्षित होणार नाही.

What are rules for wearing hijab?
What are rules for wearing hijab?Dainik Gomantak

उपर्ण- दुपट्टा हा अतिशय सामान्य कपडा आहे. हा एक प्रकारचा लांब स्कार्फ आहे, जो डोकं झाकण्यासाठी वापरला जातो. आणि खांद्यावरही घेतला जातो. दक्षिण आशियामध्ये याचा अधिक वापर केला जातो आणि तो शरीरावर सैलपणे घातला जातो. मात्र तो हिजाबसारखा बांधला जात नाही.

What are rules for wearing hijab?
What are rules for wearing hijab?Dainik Gomantak

अल-अमीरा- हा दोन कपड्यांचा सेट आहे. डोक्यावर टोपीसारखे कापड घातले जाते. दुसरे कापड थोडे मोठे असते, जे डोक्याभोवती आणि छातीभवती गुंडाळलेले असते.

What are rules for wearing hijab?
What are rules for wearing hijab?Dainik Gomantak

शायला- शायलाचा वापरही अनेक ठिकाणी केला जातो. हा एक चौकोनी स्कार्फ आहे जो डोके आणि केस झाकतो. त्याची दोन्ही टोके खांद्यावर लटकतात. सहसा त्यात घसा दिसतो. शायला आखाती देशांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

What are rules for wearing hijab?
What are rules for wearing hijab?Dainik Gomantak

चिमार- डोक्याच्या स्कार्फला जोडलेला हा आणखी एक स्कार्फ आहे जो बराच लांब असतो. यामध्ये चेहरा दिसतो, परंतु शरीर डोके, खांदे, छाती आणि हाताच्या अर्ध्या भागापर्यंत पूर्णपणे झाकलेले असते. जो हिजाबपेक्षा थोडा मोठा असतो.

What are rules for wearing hijab?
What are rules for wearing hijab?Dainik Gomantak

प्रत्येक धर्मात डोके झाकण्याची परंपरा आहे.

हिजाब व्यतिरिक्त, इतर धर्मांमध्ये इतर पद्धतीने डोके झाकण्याची परंपरा आहे. अशा परिस्थितीत, प्रत्येक धर्मानुसार, लोक वेगवेगळ्या गोष्टींनी किंवा कपड्यांना आपले डोके झाकतात, ज्यामध्ये दस्तार, टागलमस्त, मिटर, बेरेट, शट्राइमल, किप्पा इत्यादिंचा समावेश केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com