दरवर्षी 22 मार्च हा जागतिक जल दिवस म्हणून लोकांमध्ये पाण्याचे महत्व आणि पाण्याची बचत करण्यासाठी साजरा केला जातो.
शॉवरखाली आंघोळ करणे टाळावे. कारण शॉवरखाली आंघोळ केल्याने पाणी खूप जास्त वाया जाते.
पावसाळ्यात घराच्या छतावरुन पडणारे पाणी जर काही प्रमाणात साठवले जावू शकते. प्रत्येकाने वॉटर हार्वेस्टिंग केल्यास जगात पाण्याची टंचाई भासणार नाही.
घरात किंवा सार्वजनिक ठिकाणी पाण्याचे नळ गळत असेल तर लवकर दुरुस्ती करावी. यामुळे पाणी वाया जाण्यापासून वाचवू शकता.
कार धुताना किंवा बाइक धुताना पाण्याच्या पाइपएवजी बादली आणि स्पज वापरावे. यामुळे पाण्याची बचत होईल.
घरातील कामांसाठी पुरेशा प्रमाणात पाणी वापरल्यास पाण्याची टंचाई भासणार नाही. यासाठी भांडी धुताना किंवा कपडे धुताना पाण्याचा मर्यादित वापर करावा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.