गोवा: गोवा म्हटलं की केवळ एन्जॉय... दरवर्षी देश-विदेशातून पर्यटक गोव्याला भेट देण्यासाठी येतात. कारण इथले एकापेक्षा एक समुद्रकिनारे, निसर्गसौंदर्य, चर्च आणि इतर पर्यटन ठिकाणं पाहून सर्वांचं मन मोहून जातं.
गोव्याची नाइटलाइफ: तुम्ही गोव्याचा प्लॅन करत असाल तर इथल्या नाइटलाइफचा नक्की आनंद लुटा... जिथे रोज संध्याकाळी डीजे पार्टी होतात. चला तर मग नाइटलाइफसाठी प्रसिद्ध असणाऱ्या गोव्यातील ठिकाणांबद्दल जाणून घेऊया...
बागा बीच: गोव्याची राजधानी पणजीपासून 17.3 किलोमीटर अंतरावर असलेल्या बागा बीचला दररोज लाखो पर्यटक मौजमजा करण्यासाठी भेट देतात.
कोलवा बीच: हा दक्षिण गोव्यातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी एक ओळखला जातो. कोल्वा बीच उत्कृष्ट नाइटलाइफ आणि स्वादिष्ट समुद्री खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे.
अंजुना बीच: या बीचवर रात्री उशिरापर्यंत पार्ट्या सुरु असतात, इथे ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या दिवशी आणखी उत्साह असतो. तुम्हीही गोव्याला जात असाल तर तुम्ही अंजुना बीचला नक्की भेट द्या...
वागतोर बीच: पणजीपासून 22 किमी अंतरावर उत्तर गोव्यातील वागतोर बीच पार्ट्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. येथे 500 वर्ष जुना पोर्तुगीज किल्ला देखील पाहायला मिळतो.
कळंगुट बीच: तुमच्या गोवा प्लॅनमध्ये कळंगुटला भेट देणं टॉपवर ठेवा... हा बीच प्रत्येकाला खुणावतो. इथली नाइटलाइफ तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवाल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.