अंतराळ संस्था: जगातील केवळ 77 अंतराळ संस्था आणि यापैकी केवळ 16 अवकाश संस्थांकडे प्रक्षेपण क्षमता आहे.
स्पेस एजन्सी: तुम्हाला जगातील टॉप स्पेस एजन्सी माहितीयेत का? आणि त्यात भारताचे स्थान कितवे आहे? आज ( 3 सप्टेंबर) आपण या टॉप स्पेस एजन्सीबद्दल जाणून घेणारोत...
यादी: वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने फोर्ब्सच्या हवाल्याने जगातील टॉप 7 स्पेस एजन्सीची यादी जाहीर केलीय.
नासा: वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने जाहीर केलेल्या या यादीत अमेरिकेची अंतराळ संस्था नासा (NASA) पहिल्या स्थानावर आहे.
युरोपियन स्पेस एजन्सी: युरोपियन स्पेस एजन्सी (European Space Agency) या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन: चीनची अंतराळ संस्था चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (CNSA) या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
रशियन फेडरल स्पेस एजन्सी: रशियाची स्पेस एजन्सी रशियन फेडरल स्पेस एजन्सी (Roscosmos) या यादीत चौथ्या स्थानावर आहे.
इस्त्रो: भारताची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यादीत पाचव्या स्थानी आहे.
JAXA: जपानची Japan Aerospace Exploration Agency (JAXA) या यादीत सहाव्या स्थानी आहे.
कॅनेडियन स्पेस एजन्सी: कॅनेडियन स्पेस एजन्सी (CSA) या यादीत सातव्या स्थानी आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.