चित्रपट जगत: गेल्या वर्षी (2023) अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. जगभरातून गुगलवर या चित्रपटांना सर्वाधिक सर्चही करण्यात आले. चला तर मग गुगलवर कोणते चित्रपट सर्वाधिक सर्च केले गेले याबद्दल जाणून घेऊ...
रिपोर्ट: ‘ग्लोबल स्टॅटिस्टिक्स’ने 2023 वर्षातील सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटांचा रिपोर्ट शेअर केला आहे. या यादीत काही भारतीय चित्रपटांचा देखील समावेश आहे.
बार्बी चित्रपट: अमेरिकेचा ‘बार्बी’ (Barbie) चित्रपट जगभरात गुगलवर सर्वाधिक सर्च केला जाणारा चित्रपट आहे.
ओपेनहाइमर: या यादीत अमेरिकन चित्रपट ‘ओपेनहाइमर’ (Oppenheimer) हा गुगलवर सर्वाधिक सर्च केलेला दुसरा चित्रपट आहे.
जवान: शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘जवान’ (Jawan) गुगलवर तिसरा सर्वाधिक सर्च केला जाणारा चित्रपट आहे.
साउंड ऑफ फ्रीडम: ‘साउंड ऑफ फ्रीडम’ (Sound of Freedom) हा चित्रपट या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
जॉन विक-4: अमेरिकन चित्रपट जॉन विक-4 (John Wick-4) हा या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
अवतार: द वे ऑफ वॉटर: अवतार: द वे ऑफ वॉटर (Avatar: The Way of Water) हा चित्रपट या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.
एवरीथिंग एवरीव्हेअर ऑल एट वन्स: ‘एवरीथिंग एवरीव्हेअर ऑल एट वन्स’ (Everything everywhere all at once) हा चित्रपट या यादीत सातव्या क्रमांकावर आहे.
गदर-2: सनी देओल यांचा चित्रपट ‘गदर-2’ (Ghadar-2) ने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. या यादीत हा चित्रपट आठव्या क्रमांकावर आहे.
क्रीड-2: अमेरिकन चित्रपट ‘क्रीड-2’ (Creed-2) या यादीत नवव्या क्रमांकावर आहे.
पठाण: किंग खानचा आणखी चित्रपट 'पठाण' (Pathaan) हा गुगलवर सर्वाधिक शोधला जाणारा दहावा चित्रपट आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.