हे आहेत देशातील सुंदर समुद्रकिनारे..!

सुट्टीसाठी पर्यटकांची (Tourists) पहिली पसंती मिळते ती गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांना (Goa Beach). पण गोव्याशिवायही आपल्या देशात अनेक सुंदर बीच आहेत. मग एकदातरी या ठिकाणांना नक्की भेट द्या..!
Beach
BeachDainik Gomantak
Published on
Puri Beach, Odisha
Puri Beach, OdishaDainik Gomantak

1. पुरी, ओडिशा (Puri, Odisha)

ओडिशामध्ये 'पुरी' निश्चितपणे समुद्रकिनाऱ्यांच्या यादीत अव्वल आहे. शेजारच्या पश्चिम बंगालमधील लोकांमध्ये हा बीच डेस्टिनेशन खूप लोकप्रिय आहे. इथे पुरीमध्ये, सीफूड (Seafood) हे एक उत्तम पाककलेचे आकर्षण आहे.

Radhanagar Beach, Andaman and Nicobar Islands
Radhanagar Beach, Andaman and Nicobar IslandsDainik Gomantak

2. राधानगर बीच, अंदमान आणि निकोबार बेट (Radhanagar Beach, Andaman and Nicobar Islands)

हॅवलॉक बेटांचा एक भाग असलेल्या 'राधानगर' बीचला पर्यटक सर्वोत्तम समुद्रकिनारा देखील म्हणतात. फक्त स्वच्छ पाणीच नाही तर इथले जंगलही खूप मनमोहक आहे. जोडप्यांसाठी हा बीच नक्कीच एक उत्तम ठिकाण आहे.

Gokarna, Karnataka
Gokarna, KarnatakaDainik Gomantak

3. गोकर्ण, कर्नाटक (Gokarna, Karnataka)

उत्तम समुद्रकिनाऱ्यापैकी 'गोकर्ण' हा एक विलक्षण आणि पर्यटकांना भुरळ घालणारा समुद्रकिनारा आहे. हा एक असा बीच आहे जिथे आपण सर्फिंग आणि बरेच काही समुद्रामधील जलक्रीडा प्रकार करू शकतो.

Varkala, Kerala
Varkala, KeralaDainik Gomantak

4. वर्कला, केरळ (Varkala, Kerala)

मोठा खडक असलेला हा अद्भुत समुद्रकिनारा सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करणारा आहे. तुम्ही या बीचवर चालत किंवा समुद्रकिनारी असलेल्या कॅफेमध्ये हातात पेय घेऊन स्वतःसोबत निवांत वेळ घालवू शकता.

Mandarmani, West Bengal
Mandarmani, West BengalDainik Gomantak

5. मंदारमणी, पश्चिम बंगाल (Mandarmani, West Bengal)

बीच डेस्टिनेशनचा 'सुपरस्टार बीच' म्हणून ओळखल्या जाणार्या मंदारमणी बीच परिसरात फिरताना तुम्हाला सर्वत्र लाल खेकडे दिसतील. शिवाय या बीचवर बंगाली शैलीतील सीफूडची मेजवानीसुद्धा चाखायला मिळेल. असे हे गोव्याइतकेच सुंदर देशातील काही विलक्षण समुद्रकिनारे...!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com