लोकं Fish Oilच्या गोळ्या का खातात?

फिश ऑइलचा वापर करून त्वचेला निरोगी ठेवता येते. यामुळे त्वचा मऊ तर होतेच शिवाय ती चमकदारही होते.
Fish Oil
Fish OilDainik Gomantak
Published on
Updated on
Fish Oil
Fish Oil Dainik Gomantak

Skin Care With Omega 3 Acid: आपण जे अन्न खातो ते अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वे, खनिजे आणि आवश्यक पोषक तत्वांनी भरलेले असते. हे घटक आपल्या शरीरात जातात आणि त्याचे पोषक तत्वे आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवतात. असेच एक आवश्यक पोषक घटक म्हणजे ओमेगा-3, जे आरोग्यासाठी तसेच केस आणि त्वचेसाठी खुप महत्वाचे आहे. ओमेगा-३ नट्स, बिया आणि माशांमध्ये आढळते. हे पोषक तत्व शरीरासाठी खूप महत्वाचे आहे कारण यामुळे हायड्रेशन आणि वृद्धत्वाची चिन्हे यासारख्या त्वचेच्या अनेक समस्या कमी करते. ओमेगा हृदय, फुफ्फुस आणि रक्तवाहिन्या देखील निरोगी ठेवते. यामुळेच लोक फिश ऑइल गोळ्यांचे सेवन करतात. ओमेगा 3 ऍसिडचे दोन प्रकार - ईपीए आणि डीएचए जे प्रामुख्याने माशांमध्ये आढळतात. अशा परिस्थितीत जे लोक सीफूडचे शौकीन आहेत किंवा मांसाहाराला प्राधान्य देतात ते माशांमधून ओमेगा-3 ऍसिडचे सेवन करू शकतात.

Fish Oil
Fish OilDainik Gomantak

त्वचेसाठी ओमेगा -3 चे फायदे

फिश ऑइलचा वापर करून त्वचेला निरोगी ठेवता येते. यामुळे त्वचा मऊ तर होतेच शिवाय ती चमकदारही होते. त्वचेच्या आरोग्यासाठी ओमेगा 3 फॅटी अॅसिडचे अनेक फायदे आहेत.

Fish Oil
Fish OilDainik Gomantak

सुज कमी करण्यासाठी उपयुक्त

त्वचा, केस आणि आरोग्याशी संबंधित कारणांमुळे शरीराची जळजळ होते. ओमेगा 3 मध्ये एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे शरीरावरील सूज कमी करण्यास मदत करतात. यामुळे त्वचेच्या पेशी योग्यरित्या कार् करतात. ओमेगा पेशींना हायड्रेट ठेवण्यास मदत करते आणि त्वचा मुलायम बनवते.

Fish Oil
Fish OilDainik Gomantak

सुरकुत्या कमी होते

त्वचेच्या आरोग्याप्रमाणेच चांगली काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचा निरोगी ठेवल्याने त्वचेवर वृद्धत्वाचा प्रभाव कमी दिसतो. सुरकुत्या आणि बारीक खुणा यासारख्या रेषा वृद्धत्वाची चिन्हे आहेत. जसजसे आपले वय वाढते तसतसे कोलेजन नष्ट झाल्यामुळे त्वचेतील लिपिड कमी होते. अशा परिस्थितीत, त्वचेसाठी फिश ऑइल ओमेगा 3 फॉस्फोलिपिड बायलेयरवर काम करून त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. यामुळे त्वचेचे मॉइश्चरायझेशन होते आणि त्वचा मऊ दिसते.

Fish Oil
Fish OilDainik Gomantak

स्किन इंफेक्शनपासून सुटका

अनेकजण कोरड्या त्वचेच्या समस्येने त्रस्त असतात. आम्ही तुम्हाला सांगतो की कोरडी त्वचा असल्यास त्वचेवर अनेक प्रकारचे संक्रमण होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत त्वचेला मॉइश्चरायझेशन करणे खूप गरजेचे आहे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड त्वचेचे संक्रमण टाळण्यास मदत करते. ओमेगा 3 फॅटी ऍसिड त्वचेच्या पेशींमध्ये हायड्रेशन वाढवते आणि त्वचेवर जळजळ, लाल ठिपके, खाज सुटणे आणि कोरडेपणा या समस्या दूर ठेवतात.

Fish Oil
Fish OilDainik Gomantak

केसांच्या वाढीसाठी फायद्याचे

फिश ऑइल हायड्रेशनला प्रोत्साहन देण्यासाठी ओळखले जाते. ऑलिव्ह ऑईल आणि फिश ऑइलचे मिश्रण केसांना लावल्याने टाळूच्या कोरड्यापासून सुटका मिळते आणि कोंड्याची समस्याही दूर होते. ओमेगा 3 फॅटी ऍसिड केसांच्या कूपांमध्ये रक्त प्रवाह वाढवते, ज्यामुळे केसांची चांगली वाढ होते.

Fish Oil
Fish OilDainik Gomantak

मुरूमाच्या समस्येवर उपायकारक

त्वचेची पहिली समस्या म्हणजे मुरुम . जर तुम्हाला अनेकदा मुरुमांच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर त्वचेसाठी फिश ऑइल वापरा. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. त्वचा सेबम तयार करते ज्यामुळे त्वचेची छिद्रे बंद होतात. ओमेगा 3 फॅटी ऍसिड जास्त प्रमाणात सीबम उत्पादनास प्रतिबंध करते.

Fish Oil
Fish OilDainik Gomantak

त्वचा ग्लो करते

ग्लोइंग हायपरपिग्मेंटेशन झाल्यास ओमेगा 3 चा वापर केल्यास मेलॅनिन पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरते. हायपरपिग्मेंटेशनमुळे त्वचेवर काळे डाग पडतात. हे हार्मोनल बदल, वृद्धत्व, त्वचा संक्रमण किंवा कोणत्याही औषधामुळे होऊ शकते. फिश ऑइलमुळे त्वचेच्या समस्या लवकर बरे होण्याचे प्रमाण वाढवते. त्यामुळे जखमेचे संक्रमण होत नाही आणि त्वचा ग्लो करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com