Shubman Gill: गिल बनला जगातील नंबर 1 फलंदाज; बाबर आझमला पछाडलं; जाणून घ्या RO-KO ची क्रमवारी

Shubman Gill
Shubman GillDainik Gomantak
Published on
Shubman Gill
Shubman GillDainik Gomantak

स्टार सलामीवीर शुभमन गिल

टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुभमन गिलने त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत तो नंबर 1 खेळाडू बनला. त्याने पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमला मागे सोडले.

Shubman Gill
Shubman GillDainik Gomantak

शुभमनने बाबरला पछाडले

शुभमन 796 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला, तर बाबर आझम 773 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानी घसरला. बाबर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिरंगी मालिकेत अपयशी ठरला, ज्यामुळे त्याची घसरण झाली. दुसरीकडे, शुभमन गिलने नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शानदार कामगिरी केली, ज्यामध्ये त्याने 2 अर्धशतके आणि एक शतक झळकावले.

Shubman Gill
Shubman GillDainik Gomantak

शुभमन नंबर 1

शुभमन गिलने 2019 मध्ये एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने केवळ 50 एकदिवसीय सामने खेळले असून इतक्या कमी सामन्यांमध्ये तो नंबर 1 खेळाडू बनला. गिलचा हा विक्रम त्याला एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी घेऊन गेला. शुभमनने 60 पेक्षा जास्त सरासरीने 2587 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये गिलने 7 शतके आणि 15 अर्धशतके झळकावली. गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्येही द्विशतक झळकावले आहे. गिल हा एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 2500 धावा करणारा खेळाडू देखील आहे.

Shubman Gill
Shubman GillDainik Gomantak

शुभमन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये

2023 च्या नोव्हेंबर महिन्यात शुभमन गिल हा नंबर 1 वनडे फलंदाज बनला होता, पण नंतर बाबरने त्याची जागा घेतली होती. आता पुन्हा एकदा शुभमन बाबरला पटखनी देण्यात यशस्वी ठरला. तथापि, ही क्रमवारी कायम ठेवण्यासाठी शुभमनला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही चांगली कामगिरी करावी लागेल. शुभमन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. जर त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही आपला फॉर्म कायम ठेवत धावांचा पाऊस पाडला तर तो बाबरच्या खूप पुढे निघून जाईल.

Shubman Gill
Shubman GillDainik Gomantak

नवीन एकदिवसीय क्रमवारी

ताज्या क्रमवारीनुसार, शुभमन गिल अव्वल स्थानी, बाबर आझम दुसऱ्या स्थानी. तर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. दरम्यान, हेनरिक क्लासेन चौथ्या स्थानावर पोहोचला. डॅरिल मिशेल पाचव्या स्थानी, विराट कोहली सहाव्या स्थानी, हॅरी टेक्टर सातव्या स्थानी, चरित असलंका आठव्या स्थानी, श्रेयस अय्यर नवव्या स्थानी तर शे होप दहाव्या स्थानी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com