रणजी ट्रॉफी 2024-25 मध्ये 30 जानेवारी रोजी म्हणजेच आज मुंबई आणि मेघालय यांच्यात सुरु झालेल्या सामन्यात एक असा विक्रम होताना दिसला जो आतापर्यंत भारतीय देशांतर्गत क्रिकेटच्या इतिहासात कधीही घडला नव्हता.
शरद पवार क्रिकेट अकादमी बीकेसी मुंबई येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात मेघालय संघाला पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या 6 विकेट्स फक्त 2 धावांवर गमावल्या. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात यापूर्वी कधीही असे घडले नव्हते की एखाद्या संघाने इतक्या कमी धावसंख्येत आपल्या सहा विकेट्स गमावल्या.
नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबई संघाने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीने आपला निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले.
मेघालय संघाने पहिली विकेट शून्य धावांवर गमावली, त्यानंतर दुसरी विकेट एक धावांवर पडली. मुंबईकडून तिसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या शार्दुलने हॅटट्रिक घेत मेघालयच्या फलंदाजांवर दबाव निर्माण केला. चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मेघालय संघाने 2 धावांवर सहावी विकेट गमावली. पहिल्या डावात मेघालय संघातील सहा खेळाडूंना खातेही उघडता आले नाही. खालच्या फळीतील खेळाडूंमुळे मेघालयला पहिल्या डावात 86 धावांचा टप्पा गाठता आला.
जर आपण प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिल्या 6 विकेट्स पडल्यानंतर संघाच्या धावसंख्येवर नजर टाकली तर मेघालय संघ आता त्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. यादीत पहिला क्रमांक एमसीसी संघाचा लागतो, ज्याने 1872 मध्ये काउंटी हंगामात शून्य धावांवर आपल्या सहा विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर मेघालय संघाचा क्रमांक लागतो. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ऑक्सफर्ड विद्यापीठाचा संघ आहे, ज्यांनी 1867 मध्ये तीन धावांवर त्यांच्या पहिल्या सहा विकेट्स गमावल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.