Sri Lanka Crisis: रामायण फेम 'अशोक वाटिका' आर्थिक संकटात

आजही अशोक वाटिकेत रामायण कालाचे म्हणजेच त्रेतायुगाचे पुरावे उपलब्ध आहेत.
Ramayana fame Ashok Vatika
Ramayana fame Ashok VatikaDainik Gomantak
Published on
Updated on
Ramayana fame Ashok Vatika
Ramayana fame Ashok VatikaDainik Gomantak

रामायणाचा श्रीलंकेशी खूप जवळचा संबंध आहे. येथे भगवान रामाने राक्षसाचा राजा रावणाचा वध केला होता. यासोबतच माता सीतेला रावणाने ज्या ठिकाणी कैद करून ठेवले ती अशोक वाटिका देखील श्रीलंकेत आहे. रामायण काळातील अशोक वाटिका आजही अनेकांच्या स्मरणात आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आजही अशोक वाटिकेत रामायण कालाचे म्हणजेच त्रेतायुगाचे पुरावे उपलब्ध आहेत.

Ramayana fame Ashok Vatika
Ramayana fame Ashok Vatikaani

मात्र सध्या श्रीलंकेमध्ये चालू असलेल्या आर्थिक संकटा दरम्यान, नुवारा एलिया येथे स्थित रामायण फेम अशोक वाटिका, ज्याला सीता अम्मन मंदिर म्हणूनही ओळखले जाते, ती आर्थिक संकटाचा सामना करत आहे.पर्यटक सध्या श्रीलंकेला जाण्यास घाबरत आहेत. रावणाने सीतेला अशोक वाटिकेत कसे कैद करून ठेवले होते याचा उल्लेख रामायणात आहे.

Ramayana fame Ashok Vatika
Ramayana fame Ashok Vatikaani

आर्थिक मंदीमुळे मंदिर व्यवस्थापनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंदिराचे अध्यक्ष आणि नुवारा एलियाचे खासदार, व्ही राधाकृष्णन यांनी एएनआयला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत, सीता माता मंदिर चालवण्यासाठी मंदिर आणि कर्मचार्‍यांना कठीण समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याबद्दल अत्यंत गंभीर चिंता व्यक्त केली.

Ramayana fame Ashok Vatika
Ramayana fame Ashok VatikaDainik Gomantak

अशोक वाटिकेने रामायणात महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि भारतातून विशेषत: उत्तर भारतातून अनेक भाविक येथे पर्यटनासाठी येत होते. मात्र आता इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. मंदिराचा विकास भाविक आणि पर्यटकांवर अवलंबून आहे. परंतु पर्यटक नसल्याने आर्थिक आपत्तीला सामोर जात असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.

Ramayana fame Ashok Vatika
Ramayana fame Ashok VatikaDainik Gomantak

औषधे, स्वयंपाकाचा गॅस, इंधन आणि अन्न यांसह मूलभूत गरजांच्या तुटवड्यामुळे श्रीलंकेत आर्थिक स्थिती बिघडत चालली आहे, कारण आयातीसाठी पैसे देण्यास लागणारे चलनच लंकेत उपलब्ध नाही.

Sri Lanka
Sri LankaDainik Gomantak

"मी याआधी कधीही सीता मंदिर रिकामे पाहिलेले नाही. येथे प्रत्येक वेळी लोक पूजाअर्चा करत असत, पण आता येथे एकही भाविक येत नाही. श्रीलंकेत प्रचंड वीजपुरवठा खंडित झाल्याने लोक यायला घाबरतात, तिथे डिझेल-पेट्रोल आणि गॅस नाही," असे 10 वर्षांहून अधिक काळ टूर गाईडचा व्यवसाय करत असलेले प्रमोद यांनी सांगितले.

Sri Lanka Crisis
Sri Lanka CrisisDainik Gomantak

श्रीलंकेतील हॉटेल्स, रेस्टॉरंट्सचा व्यवसाय ठप्प झाला आहे. श्रीलंकेतील समुद्रकिनारे आणि रामायणाचा इतिहास एक्सप्लोर करणारे असे अनेक ठिकाणे लंकेत आहेत, परंतु आर्थिक संकटामुळे पर्यटक देशाला भेट देत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com