मुंबई-गोवा रोड ट्रिपचे नियोजन करताय? सिटबेल्ट घट्ट करा आणि या स्पॉटचा आनंद घ्या

तुम्हाला तुमच्या मित्रांसह सुट्टीला जायची इच्छा आहे का? या वातावरणात रोड ट्रिप करणे ही तुमच्या मनात येणारी पहिली इच्छा असणार आहे.
Plan Mumbai-Goa road trip Take These Pit Stops for Memorable Experience
Plan Mumbai-Goa road trip Take These Pit Stops for Memorable Experience Dainik Gomantak
Published on
Updated on
Plan Mumbai-Goa road trip
Plan Mumbai-Goa road trip Dainik Gomantak

तुम्हाला तुमच्या मित्रांसह सुट्टीला जायची इच्छा आहे का? या वातावरणात रोड ट्रिप करणे ही तुमच्या मनात येणारी पहिली इच्छा असणार आहे. जिंदगी ना मिलेगी दोबारा किंवा दिल चाहता है यांसारख्या चित्रपटांतील सिन बघून तर नक्कीच मित्रांसोबत फिरायला आवडणार. त्यासाठी मुंबई ते गोवा ही एक उत्कृष्ट रोड ट्रिप आहे जी तुम्हाला पश्चिम घाट आणि वालुकामय समुद्रकिनाऱ्यांचे हिरवेगार दर्शन करून देणारी ट्रिप असेल.

Plan Mumbai-Goa road trip
Plan Mumbai-Goa road trip Dainik Gomantak

जर तुम्हाला या रोडने जायचे असेल आणि काही अविस्मरणीय आठवणी साठवून ठेवायचे असतील तर आम्ही तुम्हाला या मार्गावर जाण्यासाठी मार्गदर्शन करणार आहोत. रस्त्याने मुंबईहून गोव्याला पोहोचण्यासाठी सुमारे 13-14 तास लागतात. मार्ग निःसंशयपणे मंत्रमुग्ध करणारा असला तरी, तुम्ही विश्रांतीसाठी थांबू शकता अशी अनेक ठिकाणे या मार्गावर आहेत. शांत बसा, तुमचे सिटबेल्ट घट्ट करा आणि आम्ही तुमच्यासाठी तयार केलेल्या यादीचा आनंद घ्या.

Plan Mumbai-Goa road trip
Plan Mumbai-Goa road trip Dainik Gomantak

लोणावळा

तुमची रोड ट्रिप मुंबईपासून सुरू करा आणि लोकप्रिय गेटवे लोणावळा येथे विश्रांती घ्या. तुम्ही कार्ला लेणी किंवा भाजा लेणींना भेट देऊ शकता किंवा लोणावळाजवळील गड किल्ले बघून पुढे जा...

Plan Mumbai-Goa road trip
Plan Mumbai-Goa road trip Dainik Gomantak

सातारा

जर तुम्हाला आपल्या इतिहासाबद्दल कुतूहल वाटत असेल, तर तुम्ही गोव्याला जाताना सातारा येथे थांबले पाहिजे. मराठा साम्राज्याशी निगडीत समृद्ध वारसा म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण तुम्हाला त्याच्या ऐतिहासिक स्थळांनी भुरळ पाडेल. भांबवली वजराई धबधबा पहायला विसरू नका. येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात.

Plan Mumbai-Goa road trip
Plan Mumbai-Goa road trip Dainik Gomantak

कोल्हापूर

सातारा आणि कोल्हापूर दरम्यानचे अंतर सुमारे 121 किलोमीटर आहे आणि तुम्हाला सुमारे 2 तास लागतील, ज्यामुळे ते दुसर्‍या थांब्यासाठी योग्य ठिकाण बनते. थांबल्यावर मिसळ पाव इथे नक्की खा. तुम्हाला खरेदीची आवड असल्यास, लेदर सँडल किंवा कोल्हापुरी चप्पल आणि साड्या येथून खरेदी करा.

Plan Mumbai-Goa road trip
Plan Mumbai-Goa road trip Dainik Gomantak

बेळगाव

किल्ल्यासाठी प्रसिद्ध असलेले बेळगाव हे तुमच्या मुंबई ते गोवा रोड ट्रिपमध्ये थांबा घेण्यासाठी महत्वाचे ठिकाण आहे. नयनरम्य दृश्य तुम्हाला या अविस्मरणीय प्रवासात तुमच्या मित्रांसोबतचे खास क्षण टिपण्याची संधी देईल.

Plan Mumbai-Goa road trip
Plan Mumbai-Goa road trip Dainik Gomantak

सावतसाडा धबधबा

मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणमधील परशुराम मंदिराजवळ सावतसाडा धबधबा आहे. हा धबधबा मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाट, चिपळूण येथे आहे. सावतसडा धबधब्याचा आनंद फक्त पावसाळ्यातच घेता येतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com