Cricket Rule: एकाच चेंडूत दोन फलंदाज बाद होणार, क्रिकेटमध्ये लवकरच येणार 'हे' 4 नवे नियम

Big Bash League: ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या बिग बॅश लीगमध्ये पुढील हंगामासाठी काही नियमांवर चर्चा होत आहे.
Cricket Rule
Cricket RuleDainik Gomantak
Published on
Cricket Rule
Cricket RuleDainik Gomantak

क्रिकेटचे नियम सहसा खेळाचं प्रशासकीय मंडळ असलेल्या आयसीसीकडून (ICC) बनवले जातात. पण कधीकधी जगभरात होणाऱ्या टी-20 लीगमध्ये काही मनोरंजक नियम आणले जातात. हे नियम फक्त लीगमध्ये वापरले जातात आणि त्यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटशी काहीही संबंध नाही.

Cricket Rule
Cricket RuleDainik Gomantak

भारतात होणाऱ्या टी-20 लीग आयपीएलमध्ये हे पाहायला मिळत. जिथं इम्पॅक्ट खेळाडूंचा वापर केला जातो. आता ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या बिग बॅश लीगमध्ये पुढील हंगामासाठी काही नियमांवर चर्चा होत आहे.

Cricket Rule
Cricket RuleDainik Gomantak

बिग बॅश लीग

बिग बॅश लीगमध्ये ज्या पहिल्या नियमाची चर्चा होत आहे तो म्हणजे नियुक्त हिटर (DH). हा नियम आयपीएलमध्ये वापरल्या जाणाऱ्या इम्पॅक्ट प्लेअरसारखा आहे. इम्पॅक्ट प्लेअरमध्ये एका खेळाडूची जागा दुसरा खेळाडू घेऊ शकतो. परंतु डीएच नियमानुसार, दोन्ही संघ त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमधून फक्त फलंदाजीसाठी एका खेळाडूला संधी देऊ शकतात. या खेळाडूला क्षेत्ररक्षण करण्याची आवश्यकता नाही.

Cricket Rule
Cricket RuleDainik Gomantak

सलग दोन षटकं

याशिवाय, या लीगमध्ये सलग दोन षटकं टाकण्याची परवानगी देण्याचाही विचार केला जात आहे. जर कर्णधाराला हवं असेल तर तो एकाच गोलंदाजाला एकाच टोकावरुन सलग 12 चेंडू टाकण्याची परवानगी देऊ शकतो.

Cricket Rule
Cricket RuleDainik Gomantak

डबल प्ले

बिग बॅश लीगच्या पुढील हंगामात 'डबल प्ले'चा नियम लागू होण्याची शक्यता आहे. या अंतर्गत, एकाच चेंडूवर दोन फलंदाज बाद होऊ शकतात. या नियमानुसार, एका फलंदाजाला कॅच आऊट किंवा बोल्ड केल्यानंतर दुसऱ्याला रनआऊट केलं जाऊ शकतं.

Cricket Rule
Cricket RuleDainik Gomantak

मेडन गोलंदाजी

बिग बॅश लीगच्या पुढील हंगामासाठी आणखी एक मनोरंजक बदलाची चर्चा होत आहे. कोणताही गोलंदाज सलग ६ डॉट बॉल टाकण्यात यशस्वी झाला तर फलंदाजाला बाद घोषित केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com