जगातील एक मोठा वाळवंटी प्रदेश आज मुसळधार पावसाशी झुंज देत आहे. उन्हापासून दिलासा मिळण्याबरोबरच शहरांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ लागल्याने लोकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
कतार आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये गुरुवारी मुसळधार पाऊस पडला आणि रस्ते पाण्याने भरले. त्यामुळे अनेकांना हॉटेल्सचा आसरा घ्यावा लागला. पावसामुळे यूएईच्या पूर्वेकडील भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली, ज्यामुळे घरांचे नुकसान झाले आणि अनेक वाहने वाहून गेली.
खलीज टाइम्सच्या वृत्तानुसार, हवामानात अचानक झालेल्या या बदलामुळे यूएईच्या हवामान विभागाने 'डेंजरस वेदर इव्हेंट्स'साठी रेड अलर्ट जारी केला आहे. सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या फोटो व्हिडिओमध्ये दिवसभराच्या पावसानंतर महामार्गावर वाहने पाण्यात तरंगताना दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये बचाव कर्मचारी पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांना वाचवताना दिसत आहेत.
अल अरबिया इंग्लिशने नोंदवले की UAE चे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण 20 हून अधिक हॉटेल्सच्या संपर्कात आहे ज्यात पुरामुळे विस्थापित झालेल्या 1,885 पेक्षा जास्त लोक अडकले आहेत. UAE हवामान खात्याने म्हटले आहे की, देशातील पावसाने 27 वर्षांचा विक्रम मोडला आहे.
कतारची परिस्थिती यूएईसारखीच आहे. मुसळधार पावसामुळे राजधानी दोहामधील रस्ते पाण्यात बुडाले आहेत. मिडल ईस्ट आयच्या वृत्तानुसार, गुरुवारी झालेल्या पावसामुळे विश्वचषकाच्या ठिकाणाजवळील रस्ते आणि वाहने पाण्याखाली गेली होती.
हे वादळ आणि पाऊस या आठवड्याच्या शेवटपर्यंत सुरू राहणार. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दोहामध्ये सुमारे 38 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
साधारणपणे येथील उन्हाळा हा कोरडा आणि अत्यंत उष्ण असतो. भारतातही राजस्थानसारख्या वाळवंटी भागात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे अनेक शहरे पाण्यात बुडाली असून अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वाळवंटातील पाऊस आणि युरोपीय देश आणि ब्रिटनमधील आग ही हवामान बदलाची सर्वात घातक उदाहरणे आहेत. काही दिवसांपूर्वी, इंग्लंड या सर्वात थंड देशाने इतिहासातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद केली. तेथिल तापमान 40 अंश सेल्सिअस पार गेले होते. दक्षिण-पश्चिम लंडनमधील हिथ्रो येथे 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.