भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका 6 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाणार आहे. दोन्ही देशांमधील पहिला वनडे सामना 6 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे खेळला जाईल. दुसरा सामना 9 फेब्रुवारी रोजी कटकमध्ये तर तिसरा आणि शेवटचा वनडे सामना 12 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे खेळला जाईल.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेदरम्यान श्रीलंकेचा महान फलंदाज कुमार संगकाराचा महान रेकॉर्ड धोक्यात येऊ शकतो. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली त्याचा हा रेकॉर्ड मोडून इतिहास रचू शकतो.
जर विराटने इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 329 धावा केल्या तर तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनेल.
इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 329 धावा काढताच विराट महान फलंदाज कुमार संगकाराचा रेकॉर्ड मोडेल. कुमार संगकारा सध्या वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 14,234 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
वनडे क्रिकेटमध्ये विराटचा रेकॉर्ड शानदार आहे. वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा (18426) करण्याचा रेकॉर्ड महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.
1. विराट कोहली (भारत) 50 शतके 2. सचिन तेंडुलकर (भारत)- 49 शतके 3. रोहित शर्मा (भारत) - 31 शतके 4. रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया) - 30 शतके 5. सनथ जयसूर्या (श्रीलंका) - 28 शतके