Know the inspiring love story of Ankita Lokhande and Vicky Jain
Dainik Gomantak
अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) आज लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघेही अनेक वर्षांपासून एकत्र आहेत आणि आज दोघेही त्यांच्या नात्यात एक पाऊल पुढे टाकत आहेत. या खास प्रसंगी आम्ही तुम्हाला त्यांच्या दोघांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगत आहोत.
Dainik Gomantak
अंकिता लोखंडे आणि विकी जैन एका पार्टीत भेटले होते. अंकिता आणि विकीच्या कॉमन फ्रेंड्सनी दोघांची एकमेकांशी ओळख करून दिली. पहिल्याच भेटीत दोघांमध्ये एक कनेक्शन निर्माण झाले होते.
Dainik Gomantak
2018 मध्ये दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. मात्र, त्यानंतर दोघांनी ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली. 2019 मध्ये अंकिताने विकीसोबतचा एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये विकी अंकिताला गुडघ्यावर बसून प्रपोज करत होता.
Dainik Gomantak
अंकिता आणि विकीच्या नात्यात अनेक चढउतार आले आहेत. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्यांच्या नात्यावर प्रश्न निर्माण झाले होते, पण विकी नेहमी अंकिताच्या पाठीशी उभा राहिला. त्याने अंकिताला नेहमीच कमकुवत होण्यापासून वाचवले आणि तिची ताकद बनली.
Dainik Gomantak
अंकिताने विकीसाठी एक खास पोस्ट शेअर करत त्याला बेस्ट बॉयफ्रेंड म्हटले आहे. अंकिताने सांगितले होते की जेव्हा सर्वजण विकी आणि त्यांच्या नात्याबद्दल नकारात्मक कमेंट करायचे तेव्हा विकीने त्याकडे दुर्लक्ष केले आणि फक्त त्याच्या प्रेमाला वाईट नजरेपासून वाचवले. आता प्रदीर्घ रिलेशनशिपनंतर दोघेही पती-पत्नी बनणार असून चाहते दोघांबद्दल खूप खूश आहेत.
Dainik Gomantak
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.