Ordering Medicine Online: ऑनलाईन औषध ऑर्डर करताय? तर 'या' गोष्टी ठेवा लक्षात

जर तुम्हीही ऑनलाइन औषध ऑर्डर करत असाल तर आमची ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
Online Medicine
Online MedicineDainik Gomantak
Published on

Ordering Medicine Online: जर तुम्हीही ऑनलाइन औषध ऑर्डर करत असाल तर आमची ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. अनेकदा लोक ऍपद्वारे औषधे ऑर्डर करताना चुका करतात, त्याकडे दुर्लक्ष करून काही खबरदारी आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला काही महत्‍त्‍वाच्‍या गोष्‍टी सांगणार आहोत, जे तुम्‍हाला लक्षात ठेवणे खूप आवश्‍यक आहे.

मार्केटमध्ये अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या लोकांना त्यांच्या सोयीसाठी घर बसल्या औषधे पुरवतात. केवळ घरी बसूनच औषधांची डिलिव्हरीच नाही तर औषधांसोबत मिळणाऱ्या सवलती आणि उत्तम ऑफर्समुळे लोक या अॅप्सकडे आकर्षित होत आहेत.

Online Shopping
Online ShoppingDainik Gomantak

तुम्ही औषधं ऑनलाइन ऑर्डर करत असाल तर तुम्ही कधीही कोणत्याही एका ई-फार्मसी अॅपवर अवलंबून राहू नका. तुमच्या फोनवर किमान दोन अॅप्स असणे आवश्यक आहे. यामुळे तुम्ही दोन भिन्न अॅप्सवरील किंमती, डिस्काउंट आणि कॅशबॅक इत्यादींची तुलना करू शकता. औषध ऑर्डर करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात घेऊन ऑर्डर द्या.

Medicine
MedicineDainik Gomantak

जेव्हाही तुम्ही कोणतेही ई-फार्मसी अॅप वापरता तेव्हा गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) किंवा अॅप स्टोअरवर अॅपबद्दल लोकांनी दिलेले रिव्यु पहिले नक्की वाचा. कारण औषधाच्या बाबतीत कोणतेही हलगरजी करु नका. आपल्या आरोग्यासाठी ते धोकादायक ठरु शकते. नेहमी ऑथेंटिक अॅपद्वारे औषध ऑर्डर करा जेणेकरून तुम्हाला औषधाच्या गुणवत्तेबद्दल खात्री बाळगता येईल.

online Shopping
online ShoppingDainik Gomantak
online shopping
online shopping Dainik Gomantak

नागरिकांच्या सोयीसाठी घराजवळील औषधाच्या दुकानातही होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच घराभोवती असलेली ही औषधी दुकाने औषधांवर 5 ते 10 टक्के डिस्काउंट देतात. पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला वेळ नसेल किंवा तुम्ही कुठेतरी अडकून पडाल, तेव्हा ई-फार्मसीऐवजी तुम्ही तुमच्या घरा जवळच्या फार्मसीमधून औषध मागवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com