Jasprit Bumrah: बुमराहने रचला इतिहास; आयसीसीचा 'हा' पुरस्कार जिंकणारा ठरला पहिला भारतीय वेगवान गोलंदाज

Jasprit Bumrah: बुमराहने रचला इतिहास; आयसीसीचा 'हा' पुरस्कार जिंकणारा ठरला भारतीय वेगवान गोलंदाज
Jasprit BumrahDainik Gomantak
Published on
Jasprit Bumrah
Jasprit BumrahDainik Gomantak

जसप्रीत बुमराहने मोठा पुरस्कार जिंकला

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अॅन्युअल अवॉर्ड्समध्ये भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मोठा पुरस्कार जिंकला आहे. आयसीसीने वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटूची घोषणा केली आहे.

Jasprit Bumrah
Jasprit BumrahDainik Gomantak

बुमराहचा जलवा

2024 मधील त्याच्या संस्मरणीय कामगिरीसाठी जसप्रीत बुमराहला वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले आहे. बुमराहने गेल्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये अफलातून कामगिरी केली होती.खासकरुन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने आपला जलवा दाखवून दिला होता.

Jasprit Bumrah
Jasprit BumrahDainik Gomantak

2024 वर्ष खास ठरलं

कसोटी क्रिकेटमध्ये 2024 हे वर्ष वर्ष जसप्रीत बुमराहसाठी खूप खास ठरले. भारताबाहेरही त्याने आपल्या घातक गोलंदाजीने सर्वांना अवाक केले.

Jasprit Bumrah
Jasprit BumrahDainik Gomantak

दिल से कामगिरी

बुमराह 2023 च्या अखेरीस पाठीच्या दुखापतीतून बरा झाल्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये परतला आणि 2024 मध्ये तो भारताचा सर्वात यशस्वी खेळाडू ठरला.गेल्या वर्षी घरच्या मैदानावर इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्ध कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. याशिवाय, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्येही तो चमकला.

Jasprit Bumrah
Jasprit BumrahDainik Gomantak

कसोटी विकेट्स

जसप्रीत बुमराहने 2024 मध्ये एकूण 13 कसोटी सामने खेळले.ज्यामध्ये त्याने 14.92 च्या सरासरीने 71 विकेट्स घेतल्या. गेल्या वर्षी तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाजही होता. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही गोलंदाजाला 60 विकेट्सचा आकडाही गाठता आला नाही.

Jasprit Bumrah
Jasprit BumrahDainik Gomantak

भारताचा चौथा गोलंदाज ठरला

कसोटी इतिहासातील 17 गोलंदाजांपैकी ज्यांनी एका कॅलेंडर वर्षात 70+ बळी घेतले आहेत, त्यापैकी बुमराह इतक्या कमी सरासरीने कोणीही विकेट्स घेतल्या नाहीत. त्याचवेळी, एका कॅलेंडर वर्षात 70+ कसोटी विकेट्स घेणारा बुमराह हा भारताचा फक्त चौथा गोलंदाज आहे.

Jasprit Bumrah
Jasprit BumrahDainik Gomantak

पहिला भारतीय गोलंदाज

जसप्रीत बुमराह हा आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जिंकणारा सहावा भारतीय आहे. त्याच्या आधी राहुल द्रविड, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, रविचंद्रन अश्विन आणि विराट कोहली यांनी हा पुरस्कार जिंकला आहे. पण त्यापैकी कोणीही वेगवान गोलंदाज नाही. म्हणजेच बुमराह हा आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणून निवडला जाणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे.

Jasprit Bumrah
Jasprit BumrahDainik Gomantak

काय म्हणाला बुमराह?

आयसीसी कसोटी क्रिकेटपटू ऑफ द इयर म्हणून निवड झाल्यानंतर जसप्रीत बुमराह म्हणाला, 'हा फॉरमॅट माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. मला नेहमीच कसोटी क्रिकेट खेळायचे होते. 2024 वर्ष माझ्यासाठी खूप खास होते. मी खूप काही शिकलो आणि सामनेही जिंकले. विझागमध्ये ऑली पोपची विकेट माझ्यासाठी खूप खास होती. हा पुरस्कार मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com