गोवा: जैवविविधतेने समृद्ध असा गोवा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. येथील वन्यजीव अभयारण्ये पाहण्साठी पर्यटक मोठी गर्दी करतात.
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन: आज (29 जुलै) आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन साजरा होत असताना गोव्यासारख्या सुशिक्षित म्हटल्या जाणाऱ्या राज्यात अन्नसाखळीच्या शिखरस्थानी असलेल्या ढाण्या वाघांना हक्काच्या नैसर्गिक अधिवासासाठी मुकण्याची केविलवाणी वेळ आलीय.
भारतात व्याघ्र प्रकल्प: भारतात ढाण्या वाघांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1973 मध्ये व्याघ्र प्रकल्प कार्यक्रमाला भारतात प्रारंभ केला.
वाघांची संख्या: देशात 3,682 वाघ आहेत.
वस्तीस्थानासाठी अधिसूचना: 1999 मध्ये गोव्याचे तत्कालीन राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल जेकब यांनी म्हादई खोऱ्याची ढाण्या वाघांच्या दृष्टीने असलेली क्षमता ओळखून अभयारण्य म्हणून अधिसूचना काढली होती.
अधिसूचना फेटाळली: मात्र गोवा सरकारने म्हादई आणि नेत्रावळी अभयारण्यातील लोह-मँगनिज खाणीतल्या खनिज उत्खननासाठी अभयारण्याची अधिसूचना फेटाळली.
वाघांची हत्या: 2018 च्या व्याघ्र गणनेत गोव्यात 3 वाघ असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र 2019 मध्ये म्हादई क्षेत्रात 4 वाघांच्या हत्येची दुर्घटना प्रकाशात आली.
भवितव्याला सुरुंग: आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र संवर्धन दिन साजरा होत असताना गोवा सरकार मात्र म्हादई अभयारण्यातील वन खात्याची पकड ढिली करुन ढाण्या वाघांच्या अस्तित्वासाठी इथली जंगले कशी प्रतिकूल होतील यासाठीच प्रयत्न करतेय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.