भारतीय रेल्वे: भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे पसरले आहे.
रेल्वेकडून नवी अपडेट: भारतीय रेल्वे नवनवीन बदल करत असते. अशीच एक अपडेट रेल्वेकडून देण्यात आली आहे, ज्याबद्दल फार कमी जणांना माहिती आहे.
तिकीट बुकिंग सुविधा: रेल्वेकडून वेगवेगळ्या प्रकारच्या तिकीट बुकिंग सुविधा पुरवल्या जातात. यामध्ये आरक्षण, जनरल, तत्काळ, चालू तिकीट यांचा समावेश आहे. सामान्यत: तिकिटाची वैधता एक दिवस असते.
56 दिवस प्रवास: पण रेल्वेच्या एका तिकिटावर तुम्ही 56 दिवसांपर्यंत प्रवास करु शकता? असं कोणी तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही ना? चला तर मग याविषयी सविस्तररित्या जाणून घेऊया...
सर्क्युलर सुविधा: सर्क्युलर सुविधेत तुम्हाला पुन्हा पुन्हा तिकीट खरेदी करण्याची गरज नसते. तुम्ही 56 दिवसांपर्यंत कोणत्याही निर्बंधाशिवाय वेगवेगळ्या मार्गांवर रेल्वेने प्रवास करु शकतात.
कोणत्याही वर्गासाठी तिकिटे: तुम्हाला अनेक ठिकाणी प्रवास करायचा असेल तर तुम्ही सर्क्युलर तिकीटाचा फायदा घेऊ शकता. यासाठी तुम्हाला रेल्वेकडून कन्फर्म तिकीट घ्यावे लागेल. रेल्वे कोचच्या कोणत्याही वर्गासाठी कोणीही सर्क्युलर तिकिटे खरेदी करु शकतो.
भाडे टेलिस्कोपिक दराने: सर्क्युलर प्रवासाचे तिकीट तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचवते. सर्क्युलर प्रवासाचे तिकीट स्वस्त आहे. या तिकिटाचे भाडे टेलिस्कोपिक दराने ठरवले जाते, म्हणजेच तुम्ही कुठे प्रवास करता यावर भाडे अवलंबून असेल.
अतिरिक्त खर्च कमी: सर्क्युलर तिकिटामुळे प्रवाशांचा अतिरिक्त खर्च कमी होतो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.