Mohammed Shami: मोहम्मद शमीच्या निशाण्यावर वर्ल्ड रेकॉर्ड, भारतासाठी करणार मोठी कामगिरी

Mohammed Shami: मोहम्मद शमीच्या निशाण्यावर वर्ल्ड रेकॉर्ड, भारतासाठी करणार मोठी कामगिरी
Mohammed ShamiDainik Gomantak
Published on
Team India
Team IndiaDainik Gomantak

भारत आणि इंग्लंड

टी-20 मालिका जिंकल्यानंतर टीम इंडिया आता इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाली आहे. दोन्ही संघांमधील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 6 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.

Mohammed Shami
Mohammed ShamiDainik Gomantak

मोहम्मद शमी

या मालिकेत चाहत्यांच्या नजरा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर असतील. शमी टी-20 मालिकेत खेळताना दिसला होता, या मालिकेत शमीने बऱ्याच काळानंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन केले. शमीसाठी पुनरागमन सामना काही खास नव्हता, पण गेल्या सामन्यात त्याने 3 विकेट्स घेतल्या होत्या. आता शमी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खळबळ उडवून देण्यासाठी सज्ज झाला आहे. शमी या मालिकेत इतिहास रचण्याच्या अगदी उंबरठ्यावर आहे, शमी पहिल्या एकदिवसीय सामन्यातही हा मोठा पराक्रम करु शकतो.

Mohammed Shami
Mohammed ShamiDainik Gomantak

दुखापत

मोहम्मद शमी 2023 च्या विश्वचषकात टीम इंडियासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. यानंतर, दुखापतीमुळे शमीला बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावे लागले होते.

Mohammed Shami
Mohammed ShamiDainik Gomantak

भारतासाठी सर्वात जलद 200 विकेट्स घेणारा खेळाडू

2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. आता शमी इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतिहास रचण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. जर शमीने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 5 बळी घेतले तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी सर्वात जलद 200 विकेट्स घेणारा गोलंदाज बनू शकतो.

Mohammed Shami
Mohammed ShamiDainik Gomantak

ऑस्ट्रेलियन दिग्गजाशी बरोबरी करणार

सध्या शमीने 101 सामन्यांपैकी 100 डावात 195 एकदिवसीय विकेट्स घेतल्या आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या नावावर आहे, ज्याने 102 एकदिवसीय डावांमध्ये 200 बळी घेतले. अशा परिस्थितीत शमी या ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाच्या विक्रमाची बरोबरी देखील करु शकतो. त्यामुळे आता शमी पहिल्या सामन्यात पाच विकेट घेण्यात यशस्वी होतो की नाही हे पाहणे बाकी आहे.

Mohammed Shami
Mohammed ShamiDainik Gomantak

एकदिवसीय मालिका महत्त्वाची असणार

इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिकाही मोहम्मद शमीसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. जसप्रीत बुमराह मालिकेतील पहिले दोन सामने खेळू शकणार नाही, त्यामुळे शमीवर बरीच जबाबदारी असेल. शमीला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाच्या संघातही समाविष्ट करण्यात आले आहे, त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी शमीसाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही शेवटची मालिका शिल्लक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com