IND vs AUS: कांगारुंना पछाडत टीम इंडिया फायनलमध्ये! पुन्हा बनली नंबर 1 टीम

Team India Wins: विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुलच्या धावांनी अंतिम फेरीत प्रवेश
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Team India
Team IndiaDainik Gomantak

टीम इंडिया

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आतापर्यंत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2005 मध्ये शानदार प्रदर्शन केले आहे.

Team India
Team IndiaDainik Gomantak

भारतीय धाकड चमकले

विराट कोहलीच्या 84 धावांची शानदार खेळी, श्रेयस अय्यरच्या 45 धावा, केएल राहुलच्या 42 धावा आणि हार्दिक पांड्याच्या 28 धावांच्या जोरावर उपांत्य सामन्यात कांगारुंनी दिलेले लक्ष्य टीम इंडियाने सहजरित्या गाठले. या शानदार विजयासह टीम इंडियाने अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. तसेच, या विजयासह टीम इंडियाने आयसीसी इव्हेंट्सच्या खास लिस्टमध्येही ऑस्ट्रेलियाला मागे सोडले.

Team India
Team IndiaDainik Gomantak

भारत बनला सर्वाधिक उपांत्य सामने जिंकणारा संघ

टीम इंडिया आता आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वाधिक वेळा उपांत्य फेरीचे सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचणारा संघ बनला आहे. टीम इंडियाने आतापर्यंत आयसीसी स्पर्धांमध्ये एकूण 19 उपांत्य फेरीचे सामने खेळले असून त्यापैकी 12 सामने जिंकले आहेत.

Australia Team
Australia TeamDainik Gomantak

ऑस्ट्रेलियन संघ

जर दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघाबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांनी एकूण 18 उपांत्य फेरीचे सामने खेळले असून ज्यापैकी 11 सामने जिंकले आहेत. दरम्यान, टीम इंडियाच्या या रेकॉर्डवरुन स्पष्ट होते की, गेल्या दशकात त्यांनी आयसीसी स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा संघ आहे, ज्यांनी एकूण 15 उपांत्य सामने खेळले असून त्यापैकी 9 सामने जिंकले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com