IND vs AUS: 2 षटकार आणि इतिहास रचला, 77 वर्षात पहिल्यांदाचा असा रेकॉर्ड नोंदवला!
Bumrah and Akash deep Dainik Gomantak

IND vs AUS: 2 षटकार आणि इतिहास रचला, 77 वर्षात पहिल्यांदाचा असा रेकॉर्ड नोंदवला!

Published on
Bumrah and Akash deep
Bumrah and Akash deep Dainik Gomantak

बुमराह-आकाश जोडी: 17 डिसेंबर 2024 रोजी टीम इंडियाचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप जोडीने कसोटी क्रिकेटमध्ये केलेला पराक्रम दीर्घकाळ स्मरणात राहील.

Bumrah and Akash deep
Bumrah and Akash deep Dainik Gomantak

शानदार खेळी: टीम इंडियाच्या या 10व्या आणि 11व्या क्रमांकाच्या फलंदाजांनी शेवटच्या विकेटसाठी शानदार खेळी खेळली.

Bumrah and Akash deep
Bumrah and Akash deep Dainik Gomantak

अफलातून षटकार: ऑस्ट्रेलियाविरुद्ध अफलातून षटकार ठोकले. या षटकारासंह कसोटीत प्रथमच 10व्या आणि 11व्या क्रमांकावरील भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध षटकार ठोकले. 77 वर्षांच्या इतिहासात हा पराक्रम पहिल्यांदाच घडला आहे.

Bumrah and Akash deep
Bumrah and Akash deep Dainik Gomantak

पॅट कमिन्सला धुतलं: गाबा येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात आकाश आणि बुमराहने टीम इंडियाच्या शेवटच्या विकेटसाठी नाबाद खेळी खेळली. या खेळीत दोघांनीही ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सविरुद्ध प्रत्येकी एक-एक षटकार ठोकले.

Bumrah and Akash deep
Bumrah and Akash deep Dainik Gomantak

टीम इंडियाला सावरलं: आकाश दीप आणि बुमराहच्या छोट्या पण महत्त्वाच्या खेळीने टीम इंडियाला सावरलं. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 445 धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने 9 विकेट गमावून 252 धावा केल्या आहेत.

Bumrah and Akash deep
Bumrah and Akash deep Dainik Gomantak

फॉलोऑनचा धोका टाळला: आकाश दीप 31 चेंडूत 27 धावा आणि बुमराह 27 चेंडूत 10 धावा करत नाबाद आहे. टीम इंडियाची नववी विकेट पडली तेव्हा फॉलोऑन टाळण्यासाठी 32 धावांची गरज होती. या कठीण काळात बुमराह आणि आकाशने संयमाने फलंदाजी केली. दोघांनी फॉलोऑनचा धोका टाळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com