Health Tips: आहारात 'या' 5 पदार्थांचा समावेश केल्यानं वाढतो जीवघेण्या कॅन्सरचा धोका

Cancer Risk Foods: तुमच्या आहारातील काही पदार्थ दीर्घकालीन आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात आणि कॅन्सरच्या जोखमीस कारणीभूत ठरू शकतात.
Health Tips
Health TipsDainik Gomantak
Published on
Health Tips
Health TipsDainik Gomantak

तळलेले किंवा जळलेले पदार्थ

अति तळलेले किंवा जळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे काही घातक दुष्परिणाम होऊ शकतात, ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. बटाटे, ब्रेड, बिस्किटे किंवा इतर कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ उच्च तापमानाला तळले किंवा भाजले गेले, तर त्यामध्ये ॲक्रिलामाईड नावाचे रसायन तयार होते. संशोधनानुसार, प्राण्यांवर केलेल्या चाचण्यांमध्ये हे कॅन्सरजन्य असल्याचं आढळलं आहे.

Health Tips
Health TipsDainik Gomantak

जास्त साखर असलेले पदार्थ

आहारात जास्त साखर असलेल्या पदार्थांचा वापर केल्यास इन्सुलिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे कोशिकांची अनियंत्रित वाढ होऊ शकते. हे काही प्रकारच्या कॅन्सरसाठी (उदा. स्तन, आतड्यांचा आणि स्वादुपिंडाचा कॅन्सर) जबाबदार ठरू शकते. साखर शरीरात क्रॉनिक इन्फ्लमेशन निर्माण करू शकते, जे कॅन्सरसाठी अनुकूल वातावरण तयार करते.

Health Tips
Health TipsDainik Gomantak

प्रोसेस्ड मीट

प्रोसेस्ड मीटमध्ये सोडियम नायट्रेट आणि नायट्राइट्स असतात, जे शरीरात नायट्रोसामाइन्स तयार करतात. हे जठराच्या आणि आतड्याच्या कॅन्सरचे प्रमुख कारण मानले जाते.

Health Tips
Health TipsDainik Gomantak

रिफाइंड पदार्थ

रिफाइंड पदार्थांमध्ये फायबर नसते, त्यामुळे पचन प्रक्रिया बिघडते आणि टॉक्सिन्स शरीरात साचतात. यामुळे आतड्याचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते.

Health Tips
Health TipsDainik Gomantak

डबाबंद पदार्थ

डबाबंद अन्नामध्ये प्रिझर्वेटिव्हज, बीपीए (Bisphenol A) सारखे केमिकल्स आणि जास्त प्रमाणात सोडियम असू शकतात. काही संशोधनांनुसार, बीपीए हा एंडोक्राइन डिसरप्टर असून तो कॅन्सरच्या वाढीला चालना देऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com