Health Tips: चांगली झोप घेणं का आहे आवश्यक? जाणून घ्या झोपेशी संबंधित 'या' 6 महत्त्वाच्या गोष्टी

Good Sleep Benefits: चांगली झोप हा उत्तम आरोग्याचा आधारस्तंभ आहे. पुरेशी आणि गाढ झोप शरीराला ऊर्जा देते, मानसिक स्वास्थ्य सुधारते आणि एकूणच जीवनशैली आरोग्यदायी बनवते.
Health Tips
Health TipsDainik Gomantak
Published on
Health Tips
Health TipsDainik Gomantak

चांगली झोप हा उत्तम आरोग्याचा आधारस्तंभ आहे. पुरेशी आणि गाढ झोप शरीराला ऊर्जा देते, मानसिक स्वास्थ्य सुधारते आणि एकूणच जीवनशैली आरोग्यदायी बनवते. चला जाणून घेऊया झोपेचे फायदे, शरीरावर होणारे परिणाम आणि चांगली झोप मिळवण्यासाठी महत्त्वाच्या पाच गोष्टी.

Health Tips
Health TipsDainik Gomantak

हृदयविकार आणि उच्च रक्तदाब

झोपेच्या कमतरतेमुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. हृदय निरोगी राहण्यासाठी कमीत कमी ७-८ तासांची झोप आवश्यक आहे.

Health Tips
Health TipsDainik Gomantak

मधुमेहाचा धोका

अपुरी झोप घेतल्याने शरीरातील इंसुलिनची कार्यक्षमता कमी होते, त्यामुळे रक्तातील साखर वाढते. यामुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते.

Health Tips
Health TipsDainik Gomantak

लठ्ठपणा आणि वजन वाढ

झोपेच्या अभावामुळे भूक वाढवणारे हार्मोन्स असंतुलित होतात, ज्यामुळे जास्त खाण्याची प्रवृत्ती निर्माण होते. सतत झोप कमी घेतल्याने मेटाबॉलिज्म कमी होतो आणि शरीरात चरबी साचते.

Health Tips
Health TipsDainik Gomantak

मानसिक आजार आणि तणाव

झोप कमी झाल्यास तणाव, चिडचिड, डिप्रेशन आणि चिंता यांसारखे मानसिक विकार होऊ शकतात. दीर्घकाळ झोपेची समस्या असल्यास नैराश्य (Depression) आणि बेचैनी (Anxiety) वाढते.

Health Tips
Health TipsDainik Gomantak

रोगप्रतिकारशक्ती कमी होणे

झोप अपुरी राहिल्यास शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते, त्यामुळे वारंवार सर्दी, ताप आणि संसर्गजन्य आजार होण्याचा धोका वाढतो.

Health Tips
Health TipsDainik Gomantak

स्मरणशक्ती आणि एकाग्रता कमी होणे

मेंदूला विश्रांती न मिळाल्यास स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता कमजोर होते. कामात आणि दैनंदिन जीवनात लक्ष केंद्रित करणे कठीण होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com