Womens U19 T20 WC 2025: गोंगडी त्रिशाची फायनलमध्ये रेकॉर्डतोड गोलंदाजी, अशी कामगिरी करणारी ठरली पहिलीच गोलंदाज!

Womens U19 T20 WC 2025: गोंगडी त्रिशाची फायनलमध्ये रेकॉर्डतोड गोलंदाजी, अशी कामगिरी करणारी ठरली पहिलीच गोलंदाज!
gongadi trishadainik gomantak
Published on
gongadi trisha
gongadi trishadainik gomantak

भारत आणि दक्षिण आफ्रिका फायनल

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषक 2025 चा अंतिम सामना खेळला गेला.

South africa
South africadainik gomantak

दक्षिण आफ्रिका

अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

gongadi trisha
gongadi trishadainik gomantak

गोंगडी त्रिशा

पण भारतीय गोलंदाजीविरुद्ध आफ्रिकेचे फलंदाज आपला जलवा दाखवू शकले नाहीत. या डावात भारताकडून गोंगडी त्रिशा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिच्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या गोंगडी त्रिशाने या स्पर्धेत चेंडूनेही चमत्कार केला. अंतिम सामन्यातही असेच काहीसे दिसून आले. या सामन्यात तिने रेकॉर्डतोड गोलंदाजी केली.

gongadi trisha
gongadi trishadainik gomantak

इतिहास रचला

अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी वेगवान सुरुवात केली. पण काही षटकांतच भारतीय गोलंदाजांनी आपला जलवा दाखवून दिला. यादरम्यान, गोंगडी त्रिशा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने तिच्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये 15 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तिने कर्णधार कायला रेनेके, मिके व्हॅन वुर्स्ट आणि सेशनी नायडू यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्रिशाच्या या शानदार कामगिरीमुळे भारतीय संघ या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला स्वस्तात बाद करण्यात यशस्वी ठरला.

gongadi trisha
gongadi trishadainik gomantak

त्रिशाचा रेकॉर्ड

यासह, गोंगडी त्रिशाने अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रमही केला. यापूर्वी हा विक्रम तीतस साधू हिच्या नावावर होता. 2023 च्या 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात तितास साधूने 4 षटकांच्या स्पेलमध्ये 6 धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचवेळी, गोंगडी त्रिशा ही 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 3 बळी घेणारी पहिली गोलंदाज बनली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com