Goa Theatre: गोव्यातील कलाकारांचा नवा आविष्कार 'कलासाद'

Goa Theatre: गोव्यातील कलाकारांचा नवा आविष्कार 'कलासाद'
Goa TheatreDainik Gomantak
Published on
Goa Theatre
Goa Theatre

गोव्याची नाट्यपरंपरा

गोव्याची नाट्यपरंपरा समृद्ध आहे. गोमंतकीय उत्सवी रंगभूमीमुळे नाटकांची आवड जनमानसात रुजलेली आहे.

Goa Theatre
Goa Theatre

नाट्यचळवळ

नाट्यप्रशिक्षण देणाऱ्या संस्था, इथले महोत्सव, एकांकिका स्पर्धा यांमुळे गोव्यातील नाट्यचळवळ सशक्त होत चालली आहे. नाट्यसंस्था आणि नव्या दमाचे कलाकार तंत्रज्ञ आल्याने एकंदरीत कलात्मक दर्जा टिकून आहे

Goa Theatre
Goa Theatre

थिएटर फ्लेमिंगो

थिएटर फ्लेमिंगो या गोव्यातील संस्थेचे उपक्रम सातत्याने चालू असतात. कार्यशाळा, महोत्सव, नाट्य निर्मिती यांतून कलाक्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे.

Goa Theatre
Goa Theatre

कलासाद

कलासाद या उपक्रमाची सुरुवात थिएटर फ्लेमिंगोने केली आहे. कला विषयक जाणीवांचा विकास व्हावा हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

Goa Theatre
Goa Theatre

उपक्रमाची सुरूवात

१५ जून रोजी या उपक्रमाची अधिकृत सुरूवात झाली. जामुन का पेड हे पहिले नाट्य सादरीकरण झाले.

Goa Theatre
Goa Theatre

बालनाट्य चळवळ

मोठ्यांच्या नाटकासोबत त्यांनी बालनाट्य चळवळही सुरु केली. ‘राजाची गोष्ट’ आणि ‘कोल्हो बाबगो’ ही दोन बालनाटके कलासादमार्फत सादर करण्यात आली.

Goa Theatre
Goa Theatre

कला टॉक

कला टॉक हा आणखी एक उपक्रम कलासादने सुरु केला आहे. कलाक्षेत्रातील नामवंत व्यक्ती या उपक्रमात आपले विचार उपस्थितासमोर मांडतात.

Goa Theatre
Goa Theatre

थिएटर क्लब

मुलांचा थिएटर क्लब ही नवी संकल्पना आहे. पाच ते पंधरा या वयोगटातील मुलांसाठी नाट्य वर्ग चालवला जातो. हे वर्ग रविवारी चालतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com