गोवा: गोव्यातील समुद्रकिनारे मोहिनी घालतात. पर्यटक मोठ्याप्रमाणात इथले कधीही न पाहिलेले आणि शांत समुद्रकिनारे पाहणे पसंद करतात.
गोव्यातील समुद्रकिनारे: गोव्यात अनेक प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत, ज्यामध्ये कळंगुट, बागा, कोलवा इत्यादी... पण आज आपण या वेबस्टोरीच्या माध्यामातून कांदोळीच्या समुद्रकिनाऱ्याविषयी जाणून घेणार आहोत.
कांदोळीचा समुद्रकिनारा: हा समुद्रकिनारा पणजीच्यापुढे अग्वाद किल्ल्यापासून सुमारे 15 किमी अंतरावर आहे. गोव्यातील कळंगुट, बागा आणि कांदोळी पार्टीसाठी लोकप्रिय बीच आहेत.
कमी गर्दी: हा समुद्रकिनारा तुलनेने कमी गर्दीचा आहे जो मोठ्या प्रमाणावर परदेशी पर्यटकांना आकर्षित करतो.
खास ओळख: कांदोळी समुद्रकिनारा हा नाइटलाइफ आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी ओळखला जातो. याशिवाय, किनाऱ्यावर असलेल्या नारळाच्या झाडामुळे हा समुद्रकिनारा पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
वैशिष्ट: कांदोळी समुद्रकिनाऱ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रिव्हर प्रिन्सेस हे जहाज 2000 पासून किनाऱ्यावर अडकले होते आणि आता ते पर्यटकांचे आकर्षण बनले आहे.
निसर्गसौंदर्य: कांदोळी समुद्रकिनारा हा निसर्गसौंदर्यासाठी ओळखला जातो. याठिकाणी स्वच्छ, सोनेरी वाळू आणि स्वच्छ पाणी आहे.
जलसाठे: कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर विविध जलसाठे आहेत, जे पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्याची संधी देतात.
जलक्रीडा: पॅरासेलिंग, जेट स्कीइंग आणि बनाना बोट राइड यांसारख्या विविध जलक्रीडांचा आनंद तुम्ही घेऊ शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.