Cabo De Rama Fort: प्रभु रामांनी मुक्काम केलेल्या गोव्यातील 'या' किल्ल्याला नक्की भेट द्या!

Cabo De Rama Fort: प्रभु रामांनी वनवासातील काही काळ गोव्यातील 'या' किल्ल्यावर घालवला; नक्की भेट द्या!
Cabo De Rama FortDainik Gomantak
Published on
Updated on
Cabo De Rama Fort
Cabo De Rama FortDainik Gomantak

गोवा: पश्चिम घाटातील निसर्ग सौंदर्यानं नटलेलं राज्य म्हणून गोव्याची ओळख आहे. येथील बीचेस, अभयारण्ये, किल्ले पर्यटकांना साद घालतात. गोव्यातही अनेक प्रसिद्ध किल्ले आहेत.

Cabo De Rama Fort
Cabo De Rama Fort

गोव्यातील किल्ले: गोव्यातील किल्ल्यांचे चांगल्या पद्धतीने संवर्धन करण्यात आले आहे. या किल्ल्यांना समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून अशाच एका किल्ल्याबद्दल जाणून घेणार आहोत.

Cabo De Rama Fort
Cabo De Rama FortDainik Gomantak

काबो डी रामा किल्ला (Cabo De Rama Fort): गोव्याच्या दक्षिण जिल्ह्यातील मडगाव स्टेशन पासून 27 कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. किल्ल्याच्या नावावरुनच आपल्या लक्षात येते कि, किल्ल्याचा संबध रामाशी असला पाहिजे.

Cabo De Rama Fort
Cabo De Rama FortDainik Gomantak

अख्यायिका: एका आख्यायिकेनुसार प्रभु राम जेव्हा 14 वर्षांच्या वनवासासाठी गेले असता, या ठिकाणी त्यांनी काही काळ घालवला होता असे म्हणतात. हा किल्ला गोव्यातील स्थानिक राज्यकर्त्यांनी बांधला आहे.

Cabo De Rama Fort
Cabo De Rama FortDainik Gomantak

तोफा: या किल्ल्यावर तुम्हाला सैनिकांसाठी केलेल्या देवड्या, ठराविक अंतरावर असणाऱ्या तोफा दिसून येतात. या किल्ल्यावर जवळपास 21 तोफा आहेत.

Cabo De Rama Fort
Cabo De Rama FortDainik Gomantak

पोर्तुगिजांचा ताबा: इ.स.1763 मध्ये तो पोर्तुगिजांनी आपल्या ताब्यात घेतला. 1792 मध्ये पोर्तुगीजांकडून इग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला.

Cabo De Rama Fort
Cabo De Rama FortDainik Gomantak

भक्कमता: किल्ल्याची तटबंदी, बुरुज, खंदक मजबूत आहेत. किल्ल्यावरुन जंगल, टेकड्या आणि अथांग अशा समुद्राचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. किल्ल्यापासून जवळच शांत, सुंदर असा काबो डी रामा समुद्र किनारा (बीच) आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com