माटोळी ही लाकडी चौकनी आराखडा गणपतीच्या (पूजेला लावतात त्या ठिकाणी) माथ्यावर लावलेली असते. त्या माटोळीला नारळ, आंब्याचे टाळ, सुपारीची पेंड, बागायतीतील फळे ज्यात तोरिंगण, म्हावळींग, निरफणस, केळीचा घड, आदी तसेच फळ भाज्या ज्यात काकडी, चिबुड, दोडगी, वांगी, भेंडी, भोपळा, करमल, चिकू,.... या सर्व फळाबरोबर पावसाळ्यात आढळणारी रान फळे ज्यात कांगोणी, माट्टी फळे, कवंडळ, घागऱ्या, कुड्याच्या शेंगा, नागुलकुडा, आदी व रान फुले ज्यात हरणे, शेरवड यांचा समावेश आहे.. परंपरागत अशी माटोळी ला फळे-फुले बांधण्याची प्रथा आहे...Dainik Gomantak