Ganesh Chaturthi Goa: 'या' वस्तूंनी सजवतात गणपती बाप्पासाठी पारंपरिक 'माटोळी'

घागऱ्या, कांगळा, कुडेफळ, आटकी, धोत्रा, रुई अशी नानाविध जंगली वनस्पति,फळे,फुलांनी गोव्यात माटोळी सजवली जातात.
Ganesh Chaturthi Matoli
Ganesh Chaturthi MatoliDainik Gomantak

|| वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ | निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा ||

पवित्र असा श्रावण महिना पूर्ण होताना ओढ लागते ती सर्वांच्या आवडत्या गणपती बाप्पाची. श्रावण महिना संपला की लगेच येणाऱ्या भाद्रपद चतुर्थीला आपण गणेश चतुर्थी म्हणून साजारी करतो. महाराष्ट्रात आणि गोव्यात हा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.

गणरायांच्या आगमनाची चाहूल लागताच सर्वजण त्याच्या तयारीत मग्न होतात. घराची रंगरंगोटी करणे, सजावट करणे, सामान सामुग्री गोळा करणे इत्यादि कामे वाटून घेतली जातात. चतुर्थीला कोकणात तसेच गोव्यात माटोळी हा प्रकार प्रमुख्याने पाहायला मिळतो. वेगवेगळ्या फळा-फुलांनी सजलेली ही माटोळी मखरात बसलेल्या बाप्पाच्या डोक्यावर सजवली जाते.

Ghagarya
GhagaryaDainik Gomantak

माटोळी म्हणजे चौकोनी आकारात बनविलेली लाकडी चौकट. त्याचा आकार हा प्रत्येकाच्या सोयीनुसार ठरविला जातो. चतुर्थीच्या आदल्या दिवशी ही चौकट सजवायला जवळपासच्या रानातील विविध प्रकारची फळे, फुले आणली जातात. मग ती आकर्षकरीत्या चौकटीवर सजवून माटोळी तयार केली जाते व श्री गणेशाच्या मखरावर सजावटीसाठी बांधली जाते.

यामध्ये घागऱ्या, कांगळा, कुडेफळ, आटकी, धोत्रा, रुई अशी नानाविध जंगली वनस्पति, फळे,फुले बांधली जातात. औषधी गुणधर्म असलेल्या या वनस्पति, मनुष्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी लाभदायी असतात. त्यामुळे चतुर्थीच्या काळात यांचा प्रभाव आपल्यावर व्हावा असा यामागचा उद्देश असतो.

Ganesh Chaturthi Matoli
पर्यटनवाढीसाठी ओडिशाचे गोव्याच्या पावलावर पाऊल; समुद्रकिनाऱ्यांवर बांधणार शॅक्स, कॉटेज...
Kudefal
KudefalDainik Gomantak

श्री गणेशाचे विसर्जन झाले की ही माटोळी खाली उतरविली जाते. पण गोव्यातील सत्तरी सारख्या गावांमध्ये चतुर्थीनंतर देखील काही दिवस ही सजलेली माटोळी तशीच ठेवतात जेणेकरून त्यावर असलेल्या औषधी वनस्पतीचा प्रभाव घरातल्या प्रत्येकावर व्हावा.  

Ganesh Chaturthi Matoli
Girish Chodankar: मंत्री रोहन खंवटेंमुळे पर्वरीत जंगलराज! पर्वरी 'क्राईम कॅपिटल' बनली; न्यायाधीश, वकीलांमध्ये भीती
Aataki
AatakiDainik Gomantak

कोणकपट्टीत वनराई जास्ती असल्याने माटोळी हा प्रकार इतर राज्यांपेक्षा इथे जास्ती पाहायला मिळतो. यामुळे आपल्याला आजुबाजूला असलेल्या रानावनाची माहिती आपल्याला प्राप्त होते. परंतु आताच्या आधुनिक काळात वेळेअभावी बाजारातून सजावटीसाठी खोटी फळे विकत घेऊन बांधली जातात जे एकदम चुकीचे आहे.

ह. भ. प. रामकृष्ण गर्दे. (डिचोली)

Kangala
KangalaDainik Gomantak

पारंपरिक माटोळीला कमी फळे बांधली जातात परंतु गोव्यात काही ठिकाणी घरच्या संपूर्ण छताचीच माटोळी केली जाते. आम्ही स्वतः जवळपास ३०० हून अधिक प्रकारची वन औषधी फळे बांधतो. या मागील प्रमुख कारण म्हणजे येणाऱ्या पिढीपर्यन्त विविध प्रकारची निसर्गाची माहिती पोहचवता येते.

शिवाजी ओझरकर (सत्तरी)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com