Independence Day: 'शोले' ते 'एक था टायगर' पर्यंत, 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेले 'हे' बॉलिवूड हिट चित्रपट

स्वातंत्र्य दिनानिमित्त दरवर्षी अनेक बॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित होत असतात.
Bollywood News
Bollywood NewsDainik Gomanatk
Published on
Updated on

स्वातंत्र्य दिनानिमित्त दरवर्षी अनेक बॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित होत असतात. चित्रपट निर्मात्यांसोबतच प्रेक्षकांमध्येही प्रचंड उत्साह दिसून येत आहे. मात्र, 2020 आणि 2021 मध्ये कोरोनाच्या उद्रेकामुळे या दिवशी एकही चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला नाही. 1947 मध्ये 15 ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या शहनाई या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती, आणि त्यानंतर हे चक्र वर्षानुवर्षे सुरू राहिले. (From Sholay to Ek Tha Tiger many Bollywood movies have released on August 15)

Shehnai
ShehnaiDainik Gomantak

शहनाई (1947)

स्वतंत्र भारताचा पहिला रिलीज झालेला चित्रपट 'शहनाई' चांगलाच गाजला होता. या चित्रपटात किशोर कुमार मुख्य भूमिकेमध्ये होते. हा चित्रपट देखील खास होता कारण तो शुक्रवारी प्रदर्शित झाला होता, त्यावेळी शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होण्याचा ट्रेंड नव्हताच. शहनाई ऐकण्यासाठी सिनेमागृहात प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि हा सिनेमा सुपरहिट ठरला.

Sholay
SholayDainik Gomantak

शोले (1975)

1975 मध्ये स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित झालेला शोले आतापर्यंतच्या सर्वात प्रतिष्ठित चित्रपटांपैकी एक आहे. तसेच ही एक कल्ट फिल्म आहे आणि तरीही अनेक बॉलीवूड दिग्दर्शक ते पाहिल्यानंतर त्यांचे चित्रपट बनवतात. या ब्लॉकबस्टर चित्रपटात धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, संजीव कुमार, अमजद खान, हेमा मालिनी, जया बच्चन यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

Tere Naam
Tere NaamDainik Gomantak

तेरे नाम (2003)

सलमान खानच्या सर्वात लोकप्रिय सिनेमांपैकी एक, तेरे नाम 15 ऑगस्ट 2003 रोजी प्रदर्शित झाला होता. हा सतीश कौशिक दिग्दर्शित तमिळ चित्रपट सेतुचा हिंदी रिमेक चित्रपट होता. हिमेश रेशमियाचे संगीत आणि चित्रपटातील प्रेम प्रसंगाने प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे खेचले.

Bachna Ae Haseeno
Bachna Ae HaseenoDainik Gomantak

बचना ए हसीनो (2008)

दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदचा 'बचना ए हसीनो' हा चित्रपट 15 ऑगस्ट 2008 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, बिपाशा बसू आणि मिनिषा लांबा यांच्या प्रमुख भूमिका होत्या तर तो त्या वर्षातील हिट चित्रपटांपैकी एक होता.

Ek Tha Tiger
Ek Tha TigerDainik Gomantak

एक था टायगर (2012)

2012 च्या स्वातंत्र्यदिनी सलमान खानचा 'एक था टायगर' रिलीज झाला होता. तसेच कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट टायगर फ्रँचायझीमधील पहिला चित्रपट होता. या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेमध्ये होते.

Satyameva Jayate
Satyameva JayateDainik Gomantak

सत्यमेव जयते (2018)

मिलाप झवेरी दिग्दर्शित 2018 मध्ये रिलीज झालेल्या सत्यमेव जयतेमध्ये जॉन अब्राहम आणि मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेमध्ये होते. या चित्रपटाचा सिक्वेलही याच वर्षी रिलीज झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com