महिला पोलीसांवर आधारित वेब सीरिजची OTT प्लॅटफॉर्मवर धूम

चित्रपटांच्या तुलनेत महिलांनाही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर योग्य ते एक्सपोजर मिळत आहे.
Female Based Indian Cop Web Series
Female Based Indian Cop Web SeriesDainik Gomantak
Female Based Indian Cop Web Series
Female Based Indian Cop Web SeriesDainik Gomantak

ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मच्या आगमनापासून, कलाकारांना भरपूर एक्स्पोजर मिळाले आहे आणि म्हणूनच आज OTT प्लॅटफॉर्मवर भरपूर वैविध्यपुर्ण स्टोरी बघायला मिळत आहे. चित्रपटांच्या तुलनेत महिलांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर योग्य ते एक्सपोजर मिळत आहे. अलीकडच्या काळात, अशा अनेक वेब सिरीज आल्या आहेत ज्या कॉप ओरिएंटेड (cop web series) आहेत आणि ज्यांना चाहत्यांनीही पसंत केले आहे. यात महिलाभिमुख कॉप वेब सिरीज (Web Series) देखील आहे. जाणून घेऊया अशाच काही चांगल्या वेब सिरीजबद्दल (indian web series).

delhi crime
delhi crimeTwitter

दिल्ली क्राइम - दिल्ली क्राईम ही वेब सिरीज 2012 साली दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणावर बनवण्यात आली होती. या वेब सिरीजचे जगभरातून कौतुक झाले. त्या वेदनादायक अपघातावर वेब सिरीज बनवणं हे मोठं धाडसाचं काम होतं पण समाजाला आणि समाजात राहणा-या लोकांना तो वास्तविक आरसा दाखवणं गरजेचं होतं. वेब सीरिजमध्ये शेफाली शाहने दिल्ली पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती आणि वेब सीरिजमध्ये तिने तिच्या टीमसोबत या प्रकरणाचा कसा सामना केला हे दाखवण्यात आले आहे. (Female Based Indian Cop Web Series)

she
sheTwitter

शी- शी ही एक क्राइम ड्रामा वेब सिरीज असून अदिती पोहनकर महिला पोलिसाच्या भूमिकेत आहे. ती एका गुप्त मोहिमेत कशी सामील होते आणि वेश्याव्यवसायाचे नाटक करून बड्या दहशतवाद्यांना पकडून देण्यात मदत करते, हे या वेब सिरीजमध्ये दाखवण्यात आले आहे. या वेब सीरिजमध्ये विजय वर्मानेही उत्तम काम केले आहे.

Hundred
HundredTwitter

हंड्रेड - लारा दत्ताने या अॅक्शन-कॉमेडी वेब सीरिजमध्ये काम केले. 'हंड्रेड'मध्ये लाराची वेगळी शैली पाहायला मिळाली. ही वेब सिरीज खूप रंजक आहे, जेव्हा एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न असलेल्या दोन व्यक्तींचे आयुष्य एकमेकांशी भिडते, तेव्हा काय होते, हे यात दाखवण्यात आले.

Grahan
GrahanTwitter

ग्रहण- सत्य व्यास यांच्या “चौरासी” या कादंबरीवर (ग्रहण) वेब सिरीज बनवण्यात आली आहे. वास्तविक जीवनातील घटनांवर आधारित वेब सीरिजमध्ये झोया हुसैनने एसपी अमृता सिंगची भूमिका साकारली आहे. तीने आपल्या भूमिकेने सर्वांना प्रभावित केले. डिस्ने प्लस हॉटस्टारवर ही वेब सिरीज पाहता येईल.

Flesh
FleshTwitter

फ्लेश- स्वरा भास्करने या वेबसीरिजमध्ये एसपी अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. मानवी आणि लैंगिक तस्करी उद्योगावर बनलेली ही वेबसीरिज चाहत्यांना चांगलीच आवडली होती. विशेषतः स्वराच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. ही वेब सिरीज दानिश अस्लम यांनी दिग्दर्शित केली असून ती तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.

जमतारा
जमताराTwitter

जमतारा- जामतारा ही क्राइम ड्रामा वेब सिरीज आहे. यात अमित सैल, देव्येंदू भट्टाचार्य आणि मोनिका पनवार प्रमुख भूमिकेत होते. वेब सीरिजमध्ये मोनिकाने इन्स्पेक्टर डॉली साहूची भूमिका साकारली होती, जी वास्तविक जीवनातील महिला अधिकारी जया रॉय यांच्यापासून प्रेरित होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com