भयभीत जग: जगात सध्या युद्धाचं सावट आहे. एकीकडे रशिया-युक्रेन तर दुसरीकडे इस्त्रायल-हमास युद्धाने जग हादरलयं.
युद्ध पद्धती: आजच्या काळात युद्धाच्या पद्धती बदलल्या आहेत. क्षेपणास्त्रांनी युद्धशास्त्रात क्रांती केली आहे.
धोकादायक क्षेपणास्त्रे: आज (9 सप्टेंबर) आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून जगातील धोकादायक क्षेपणास्त्रांबद्दल जाणून घेणारोत.
DF-41: DF-41 हे चीनचे सर्वात प्रगत आणि वेगवान आंतरखंडीय क्षेपणास्त्र (ICBM) आहे. हा Mach 25 अंदाजे 30,625 किमी प्रति तासाचा वेग गाठू शकतो. हे स्वतंत्रपणे लक्ष्य करण्यायोग्य रीएंट्री वाहनांसह सुसज्ज आहे.
UGM-133 ट्रायडेंट II: ट्रायडेंट II हे युनायटेड स्टेट्सद्वारे वापरले जाणारे पाणबुडवरुन लाँच केलेले क्षेपणास्त्र आहे. हे 12000 किमी अंतरापर्यंतच्या लक्ष्यांवर मारा करु शकते. त्याचा वेग 24 Mach आहे.
LGM-30 मिनिटमॅन III: Minuteman III हे अमेरिकेचे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे. हे अमेरिकेच्या अण्वस्त्रांपैकी एक आहे. हे Mach 23 (सुमारे 28,300 किमी प्रति तास) वेगाने 13000 किमी अंतर कापते. 1970 पासून ते सेवेत आहे.
Hwasong-15: Hwasong-15 हे उत्तर कोरियाचे सर्वात शक्तिशाली आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे. ते 13000 किमी पर्यंत टार्गेट करु शकते. त्याचा वेग 22 Mach आहे. उत्तर कोरिया आणि अमेरिकेला मारण्याची क्षमता त्यात आहे.
RS-28 सरमत: RS-28 सरमतला शैतान-2 असेही म्हणतात. हे रशियाचे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे. हे मॅच 20 च्या वेगाने प्रवास करु शकते. ते अनेक अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते.
एवनगार्ड: एवनगार्ड हे रशियाचे हायपरसोनिक ग्लाइड व्हेईकल (HGV) आहे. ते 6000 किमीच्या रेंजसह मॅच 20 च्या वेगाने लक्ष्य गाठू शकते.
AGM-183A: AGM-183A हे हवाई प्रक्षेपित रॅपिड रिस्पॉन्स शस्त्र आहे. ते ताशी 24500 किमी वेगाने उड्डाण करु शकते. त्याची रेंज 1600 किमी आहे. हे शस्त्र अमेरिकन लष्कर वापरते.
किंजल क्षेपणास्त्र: किंजल क्षेपणास्त्र हे रशियन हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे. ते 2000 किमीच्या रेंजसह मॅच 10 च्या वेगाने प्रवास करु शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.