INS Dunagiri: 'दुनागिरी' युद्धनौका नौदलात सामील, समुद्रात भारताची ताकद वाढणार

जीआरएसईची ही दुसरी युद्धनौका आहे. या सातही युद्धनौकांना देशातील विविध पर्वतरांगांच्या नावावरुन नावे देण्यात आली आहेत.
INS Dunagiri
INS DunagiriANI
INS Dunagiri
INS DunagiriANI

INS Dunagiri Launched: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) आज पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता दौऱ्यावर आले आहेत. जिथे त्यांनी हुगळी नदीत भारतीय नौदलाचे (Indian Navy) शिवालिक श्रेणीचे फ्रिगेट INS दुनागिरी (INS Dunagiri) लाँच केले. उत्तराखंडमधील एका शिखराच्या नावावर असलेली ही युद्धनौका गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स म्हणजेच कोलकाता येथील जीआरएसई शिपयार्डने बनवली आहे.

INS Dunagiri
INS DunagiriANI

INS दूनागिरी ही प्रोजेक्ट-17A ची चौथी युद्धनौका आहे जी आज लॉन्च करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत नौदलासाठी एकूण सात शिवालिक वर्ग फ्रिगेट्स बांधण्यात येणार आहेत. यापैकी चार मुंबईतील माझगाव डॉकयार्ड येथे तर उर्वरित तीन जीआरएसई येथे बांधण्यात येत आहेत. माझगाव डॉकयार्डने यापूर्वीच या वर्गाच्या दोन युद्धनौका समुद्रात सोडल्या आहेत. या वर्गाची तिसरी युद्धनौका उदयगिरी गेल्या महिन्यातच दाखल झाली. जीआरएसईची ही दुसरी युद्धनौका आहे. या सातही युद्धनौकांना देशातील विविध पर्वतरांगांच्या नावावरुन नावे देण्यात आली आहेत.

INS Dunagiri
INS DunagiriANI

शिवालिक वर्गातील इतर युद्धनौकांप्रमाणे दुनागिरी ही देखील संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबी भारताची महत्त्वाची ओळख आहे. या युद्धनौकेतील 75 टक्के शस्त्रे, उपकरणे आणि स्वदेशी यंत्रणा आहेत. या सर्व युद्धनौकांची रचना नौदलाच्या नौदल संचालनालयाने तयार केली आहे.

INS Dunagiri
INS DunagiriANI

आयएनएस दुनागिरीची खासियत

दुनागिरीसह प्रोजेक्ट 17A ची सर्व फ्रिगेट्स शिवालिक क्लास (प्रोजेक्ट-17) युद्धनौकांसाठी फॉलो-ऑन आहेत आणि सर्वांमध्ये त्यांच्या पूर्ववर्तींच्या तुलनेत उत्तम स्टेल्थ वैशिष्ट्ये, प्रगत शस्त्रे, सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली आहेत.

INS Dunagiri
INS DunagiriANI

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज लॉन्च केलेली दूनागिरी युद्धनौका नौदलाच्या जुन्या दूनागिरी ASW फ्रिगेटचा अवतार आहे. जुने फ्रीगेट 33 वर्षे सेवा पूर्ण करून 2010 मध्ये निवृत्त झाले होते. नवीन फ्रीगेटचे नाव त्याच्या नावावर ठेवण्यात आले आहे. खरे तर भारतीय नौदलाची परंपरा आहे की, नवीन युद्धनौकेला निवृत्त (डी-कमिशन्ड) युद्धनौकेचे नाव दिले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com