कोरोना क्वॉरंटाईन आणि इंडियन पॅनोरामा

असं क्वचितच होतं की एकाच पार्श्वभूमीवर चित्रपट (Film) तयार होतात आणि ते इंडियन पॅनोरमा विभागात निवडलेही जातात
कोरोना क्वॉरंटाईन आणि इंडियन पॅनोरामा
कोरोना क्वॉरंटाईन आणि इंडियन पॅनोरामाDainik Gomantak
Published on
Updated on

असं क्वचितच होतं की एकाच पार्श्वभूमीवर चित्रपट (Film) तयार होतात आणि ते इंडियन पॅनोरमा विभागात निवडलेही जातात. पण बाविसाव्या इफ्फीत (IFFI) हे घडणार आहे. कोरोना क्वॉरंटाईनची पार्श्वभूमी असलेले ‘कालकोख्खो’ (बंगाली, दिग्दर्शक राजदीप पॉल), ‘सनी’ (मल्यालम, दिग्दर्शक रंजीथ शंकर) आणि ‘अल्फा बीटा गॅमा’ (हिंदी, दिग्दर्शक शंकर श्रीकुमार) हे चित्रपट आपल्याला इंडियन पॅनोरामा विभागात पाहायला मिळणार आहेत.

कालकोख्खो

संसर्गजन्य साथीच्या काळात एक तरुण स्त्री, एका डॉक्टरचे अपहरण करते. निर्जन स्थळी असलेल्या या घरात तीन स्त्रियांबरोबर बंदी असलेल्या डॉक्टरला जाणीव होते की त्या घरात आणखीन काही वेगळ्या शक्ती वावरत आहेत आणि तो अवकाश आणि वेळ यात अडकून पडण्याचा संभव आहे. दिग्दर्शक राजदीप पॉल यांचा हा पदार्पणातील चित्रपट आहे.

Dainik Gomantak

सनी

रंजिथ शंकर यांच्या या चित्रपटात एकच पात्र आहे हे पात्र स्वतःला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन करून घेते आणि त्यानंतरच्या काळात जे घडते त्यात वैशिष्ट्यपूर्ण मानवी स्वभावांचे दर्शन घडते. आपण एकच पात्र घेऊन सिनेमा करावा हे रणजीत हे दिग्दर्शक रंजीथ यांचे स्वप्न होते. कोरोनाकाळात त्यांनी या चित्रपटाची कथा लिहायला घेतली, जी पूर्ण करायला त्यांना सहा महिन्यांचा काळ लागला.

Dainik Gomantak

अल्फा बीटा गामा

जेव्हा घातक कोरोना जगभर पसरायला सुरुवात होते तेव्हा एक स्त्री, तिचा माजी आणि भावी नवरा असे तिघेही जण एकाच छताखाली चौदा दिवस अडकून पडतात. दरम्यान घडणाऱ्या घटनांमधून त्यांना त्यांच्या ‘अडकले’पणाची जाणीव वेगळ्या तऱ्हेने होते.

Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com