गोवा: गोव्याला जसं निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभलं आहे तसंच ऐतिहासिक वारसाही लाभला आहे. तुम्ही आयुष्यात एकदा तरी गोव्याला भेट दिली पाहिजे.
चर्च ऑफ सेंट फ्रान्सिस ऑफ असीसी (Church of St Francis of Assisi): आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यामातून 'चर्च ऑफ सेंट फ्रान्सिस ऑफ असीसी' बद्दल जाणून घेणार आहोत. चर्च ऑफ सेंट फ्रान्सिस असीसी गोव्यातील एक रोमन कॅथोलिक चर्च आहे.
इंटिरियर: या चर्चचे इंटिरियर खूप खास आहे. तुम्हाला ते नक्कीच प्रभावित करेल.
संग्राहलय: या चर्चविषयी आणखी एक आकर्षक गोष्ट म्हणजे आत असलेले संग्रहालय. संग्रहालयात बऱ्याच कलाकृती, पेंटिंग्ज आणि जबरदस्त आकर्षक शिल्पंही आहेत.
जीवनशैलीचा अभ्यास: शतकानुशतके पूर्वी गोव्यामध्ये अस्तित्त्वात असलेली समृद्ध जीवनशैली तुम्हाला अनुभवायची असेल तर तुम्ही या चर्चला नक्की भेट दिली पाहिजे.
कुठे आहे?: उत्तर गोव्यातील वेल्हामध्ये हे चर्च वसलेले आहे. पुष्प रचना आणि सुबक लाकूडकाम तसेच डिझाइन केलेले फ्रेस्कॉस हे देखील आपणास अवश्य पाहायला मिळेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.